संजय राऊतांनी दादरचा फ्लॅट, अलिबागची जमीन कशी विकत घेतली? वकिलांनी कोर्टात सांगितलं
Views: 147
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 51 Second

मुंबई, 1 ऑगस्ट : पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष ईडी न्यायालयाने (ED Court) 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं.

प्रविण राऊत (Pravin Raut) पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, तसंच अलिबागची जमीनही विकत घेण्यात आली, असा गंभीर आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला.

ईडीच्या वकिलांचे हे आरोप संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी फेटाळून लावले. संजय राऊत यांची अटक राजकीय हेतूने करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करून अनेक महिने झाले, मग इतके दिवस कारवाई का करण्यात आली नाही? कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती, असा आरोप संजय राऊतांच्या वकिलांनी केला.

 

वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले, जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बँक खात्याने घेतले असते का? घर घेतलं असेल किंवा जमीन घेतली असेल, तर सगळे पैसे कायदेशीररित्या चुकते केले आहेत. हे पैसे कायदेशीर मार्गाने कमावले होते, असा दावा राऊतांच्या वकिलांनी केला.
इडी कोठडी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही कारवाईच राजकीय हेतूने करण्यात आली आहे. संजय राऊत इडीच्या चौकशीला सहकार्य करत नाहीत, हा आरोप धादांत खोटा आहे. जेव्हा चौकशीला बोलावलं तेव्हा ते गेले, पण गेल्या काही दिवसांमध्ये ते चौकशीला गेले नाहीत तेव्हा राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा निवडणूक आणि इतर निवडणुका होत्या. याची माहिती इडीला दिली गेली होती, असा युक्तीवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला.

दरम्यान संजय राऊत यांना घरचं जेवण देण्यात यावं, अशी विनंतीही त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली आहे. तसंच रात्री उशीरापर्यंत चौकशी केली जाते, हे तब्येतीला हानीकारक आहे, असा मुद्दा राऊतांच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. तेव्हा बरोबर आहे, मग तुम्हीच सांगा कोणत्या काळात चौकशी करायची? असा प्रश्न न्यायाधिशांनी विचारला. सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान संजय राऊत यांची चौकशी केली जाईल, तसंच ते त्यांच्या वकिलांशी सकाळी 8.30 ते 9.30 या भेटू शकतात, असं इडीने सांगितलं.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “संजय राऊतांनी दादरचा फ्लॅट, अलिबागची जमीन कशी विकत घेतली? वकिलांनी कोर्टात सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?