आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड स्टेशन येथिल उभारण्यात आलेले होल्डिंग तात्काळ हटविण्यात यावा – विशाल कसबे
Views: 132
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 39 Second

पिंपरी चिंचवड:  चिंचवड स्टेशन येथिल आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारका शेजारीच एक होल्डिंग उभारलेले आहे . या होल्डिंगमुळे संपूर्ण स्मारकाची शोभा जात आहे
लाखो रूपये खर्चून लहूजीच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले.
या होल्डिंगमुळे स्मारक झाकले जाते तसेच आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद हे देशाच्या स्वातंत्र्याचे भिष्मपीतामह होते त्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले त्यांची प्रेरणा लहान थोरांपर्यंत घराघरात पोहचवण्यासाठी या ठिकाणी लोक येत आहेत.
या ऐतिहासिक क्रांती स्थळा शेजारी उभारलेले होल्डिंग बाधा आणत आहे . आमच्या अस्मिते सोबत खेळले जात आहे , तरी आपण तात्काळ हे होल्डिंग इतर दुसर्‍या ठिकाणी हलवावे अशी मागणी मातंग एकता आंदोलन युवक आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष विशाल कसबे यांच्या वतीने करण्यात आली.
तसेच या ठिकाणी नव्याने स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या स्मारकाला दोन्ही बाजूला लोखंडी गेट बसवावे कारण दोन्ही बाजू उघड्या आहेत या ठिकाणी भटकी कुत्री येऊन घाण करतात तरी आपण त्वरीत या ठिकाणी दोन्ही बाजूला लोखंडी गेट बसवावे ,
आणी या स्मारका मध्ये लहुजी व त्यांचे शिष्य वासुदेव बळवंत फडके यांचे पुतळे आहेत त्यांच्या समोरील बाजूस लाल रंगाची पट्टी बसवलेली आहे ती लाल ऐवजी पिवळी रंगाची करावी व त्यावर लाल रंगाचा सूर्य काढावा हि आपणांस आमच्या संघटनेच्या वतीने व समस्त मातंग समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली
यावेळी शहराचे युवक अध्यक्ष विशाल कसबे, शहर मातंग एकता आंदोलन कार्याध्यक्ष अजय खंडागळे, उपाध्यक्ष अक्षय उदगिरे, सचिव सौरभ शेलार, सरचिटणीस रमेश तुपे, सहसचिव रोहित कसबे आदी उपस्थित होते.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?