पोर्तुगीजांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे केलेल्या अत्याचाराचा इतिहास जगासमोर आणल्याशिवाय हिंदु समाज स्वस्थ बसणार नाही – रमेश शिंदे
Views: 169
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 20 Second

‘गोवा फाइल्स’ : ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद

पुणे: गोव्यासह संपूर्ण कोकण ही भगवान परशुरामांची भूमी आहे, हे ऐतिहासिक, पौराणिक सत्य आहे. गोव्याची भूमी ही ख्रिस्ती पंथ उदयापूर्वीची आहे. तरीसुद्धा गोवा ही ‘वास्को’ आणि ‘झेव्हिअर’ची भूमी आहे, असे सांगून त्यांचा उदोउदो केला जातो. याच झेव्हीयरने गोव्यात ‘इन्क्विझिशन’ लागू केले. गोव्यातील ‘इन्क्विझिशन’च्या काळात येथील ‘हात कातरो’ खांब एकमात्र महत्त्वाचा पुरावा शिल्लक राहिला आहे. याच खांबाला बांधून त्या काळी हिंदूंचे हात कापले गेले. ‘हात कातरो’ खांब जुने गोवा येथे पूर्णतः दुर्लक्षित स्थितीत आहे. हा इतिहास सरकार आणि पुरातत्त्व खाते यांच्या माध्यमातून पुसून टाकण्याचे षडयंत्र चालू आहे. स्पेन, रशिया यांसह अनेक देशांत ‘इन्क्विझिशन’च्या काळातील पुरावे आणि अवशेष यांचे जतन करून संपूर्ण जगाला पाहण्यासाठी संग्रहालयात ठेवले आहे; मात्र गोव्यात ‘हात कातरो’ खांब अर्थात ‘इन्क्विझिशन पिलर’ याचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे, मात्र हिंदू समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे पोर्तुगीजांनी हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन *हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे* यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित *‘गोवा फाइल्स’- ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार?’* या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

या विशेष संवादात ‘इन्क्विझिशन’चे स्वरूप दर्शवणारा एक व्हीडीओ दाखवण्यात आला. या व्हीडीओमध्ये जगभरात कशाप्रकारे ‘इन्क्विझिशन’ केले गेले, हे सचित्र आणि ऐतिहासिक संदर्भासह *राष्ट्रीय ऐतिहासिक अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्राचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री* यांनी मांडले. तसेच ‘इन्क्विझिशन’संदर्भात ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ऑफ इंडीयन हिस्ट्री, पुणे’ यांच्या वतीने बनवण्यात आलेले आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले चित्रमय फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते.

गोव्यामध्ये ‘इन्क्विझिशन’ लागू करण्यासाठी उत्तरदायी असलेला, ज्याच्या पुढाकाराने गोव्यामधील हिंदूंवर अत्याचार करण्यात आले त्या फ्रान्सिस झेव्हियरला संताचा दर्जा दिला जात आहे. हिंदूंवर केलेले अत्याचार लपवण्यात आले, ते ‘गोवा फाइल्स’द्वारे जगभरातील लोकांसमोर आणून राष्ट्रवाद जागृत करणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे, असे *गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी* यांनी या वेळी सांगितले. *सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस* या वेळी म्हणाले की, गोव्यातील वोट बँक जपण्यासाठी येथे सेंट झेव्हियरचे उदात्तीकरण करण्यात आले. पोर्तुगीजांविषयी येथे सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले गेले. पोर्तुगीजांचा अमानवीय अत्याचार करणारा इतिहास येथील शालेय पाठ्यपुस्तकांत शिकवलाच जात नाही. जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन माफी मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकीयांची माफी अद्याप मागितलेली नाही. पोप यांनी गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी गोव्यासह सर्वत्रच्या हिंदु नागरिकांनी केली पाहिजे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?