August 13, 2022
राज्यपाल कोश्यारीजी, तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का?
Views: 178
1 0

Share with:


Read Time:2 Minute, 59 Second

राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी,

१. तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातून गुजराती, राजस्थानी बाजूला झाले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का?

२. तुमच्या माहितीसाठी सांगतो – महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. गुजरात, राजस्थानच नव्हे तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात मराठी मनगटाचा आणि मुत्सद्देगिरीचा दबदबा होता. हे तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा, तुम्हाला मराठी मातीचा इतिहास कळावा यासाठी आमच्या शालेय इतिहासाची क्रमिक पुस्तकं तुम्हाला मोफत उपलब्ध करून द्यायला तयार आहोत!

३. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी इथल्या माणसांनी आपलं रक्त सांडलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा,म्हणजे आचार्य अत्रेंचे ‘नवयुग’मधील अग्रलेखही तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देता येतील!

४. तुमच्या मनात मराठी माणसाबद्दल इतकी तुच्छता असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद सांभाळणे ही मराठी जनासाठी अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे.

५. तुम्ही जर असं समजत असाल की सत्तेचे वारे तुमच्या मर्जीने वाहते आहे म्हणून मराठी मातीचा वाटेल तसे अपमान आम्ही मुकाट सहन करू तर तुमच्या काळ्या टोपीखालच्या मेंदूला अजून महाराष्ट्र म्हणजे काय हे नीट उमगलं नसावं! तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर खुद्द औरंगजेब मराठी राज्य बुडवायला इथे तळ ठोकून बसला होता. तो याच मातीत गाडला गेला पण मराठी मातीचं अस्तित्व संपवणे त्याला शक्य झालं नाही! वाटल्यास त्याची कबर बघून या, म्हणजे तुमची खात्री पटेल की मराठी माती सत्तेच्या मस्तीला जुमानत नाही!!

बाकी तुम्ही जो कोणी देव मानत असाल तो तुमच्या काळ्या टोपीने झाकलेल्या पांढऱ्या केसांखाली असलेल्या डोक्यात विवेकाचा थोडा प्रकाश पाडो, ही सदिच्छा!!!

रुद्र भोईर यांचा लेख 

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
Is there any news?