पुणे, ४: राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावरआधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. भगवदगीते मध्ये सुद्धा ही शिकवण दिलीआहे. त्याच प्रमाणाने मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणिविज्ञानाच्या एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे, असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनीभाकित केल्या प्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल, असे विचार महाराष्ट्राचेराज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीआणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पण, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते श्रीमद भगवद्गीतेच्या सव्वालाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.
यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीसयुनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्षप्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. स्वाती चाटे कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योतीढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जीवनामध्ये साधऩामहत्वाची आहे. अधिक साधना केल्यास त्याचे योग्य फळ मिळते. आज लोक श्रीमंतांचे नाही,तर संतांचे पाय धरतात. कारण संत साधनेमध्ये मग्न असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ.विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारीअर्जुनाची गरज आहे. सर्व धर्माचा सार शांती हा आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीयसंस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा. सदाचाराचे शिक्षणासोबतआधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्वसांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भगवदगीता ज्ञानआणि आध्यात्माचा समन्वय आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरूबनेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुद्धा आध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असल्याचे त्यांनीसांगितले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“ अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आज जगाला अर्पण करत आहोत. जगात ज्ञानाचेदालन म्हणून उदयास येईल. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिलेहोते, ते सत्यात उतरण्याची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानालासाथ देत एमआयटी ग्रुप श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा प्रती वाटप केल्या आहेत.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ शिक्षण पद्धतीमध्येजागतिक शांततेचा अभ्यासक्रम अंर्तभाव व्हावा. या वास्तूच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचासंदेश देईल. वसाहतवादी मानसिकता बदलण्याची गरज आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याचीभावना आहे. स्वतंत्रता दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा व्हावा. धर्म, जात, पैसेहे लोकशाहीचे सर्वात मोठे शत्रू आहे.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले,“ हिंदु संस्कृती आणि वेदांमध्ये मानव कल्याणाचा मार्गसांगितला आहे. हिंदू धर्माचे सार गीतेमध्ये आहे. पुरुषार्थ, कामार्थ, मोक्षार्थ आणिअर्थ या यशस्वी जीवनासाठी महत्वाच्या बाबी आहेत.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनीसूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

Read Time:5 Minute, 46 Second