पुणे: ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्राथमिक तपासणी ,नेत्र तपासणी, फिजीओथेरपी व समुपदेशन शिबीर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे संपन्न झाले.
सदर शिबिराचे उद्घाटन मा. श्री. मुळे (लेखाधिकारी तथा सहाय्यक संचालक वित्त व लेखा,प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाज कल्याण पुणे ) व संगीता डावखर( सहा. आयुक्त , समाजकल्याण ,पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक व संपत्ती असून त्यांनी आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी असे डावखर यांनी सांगितले.
मा. श्री. राजीव कुलकर्णी ( व्यवस्थापक हेल्पेज इंडिया) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरता दवाखाना संकल्पना व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
डाॅ. अखिल विजय ( एच. व्ही देसाई हाॅस्पीटल)यांनी ज्येष्ठ नागरिकांनी वयोमानानुसार डोळ्यांची काळजी व नियमित तपासणीचे महत्व सांगितले.
प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे योजनांची माहिती दिली.
श्री. दिलीप पवार ( अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, विश्रांतवाडी) यांनी सदर शिबीरीचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करत, उपस्थित ज्येष्ठ नागरिकांवी मार्गदर्शन केले.
मा. श्री मुळे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये ज्येष्ठ नागरिक यांना आनंदी व निरामय जीवनाबाबत मौलिक मार्गदर्शन करत, शासन नेहमी आपल्या पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
सदर शिबिराचा उद्धाटन प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाजकल्याण पुणे विभाग, सहा. आयुक्त कार्यालय पुणेचे अधिकारी, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
एकूण ५७ ज्येष्ठ नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
श्रीमती नेत्राली येवले (स. क. नि, पुणे) , शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा) व श्री. मंगेश गाडीवान ( तालुका समन्वयक), श्री. राजेंद्र शेलार( तालुका समन्वयक) यांनी सदर ज्येष्ठ नागरिक आरोग्यतपासणी व समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
सदर ज्येष्ठ नागरिक -आरोग्य शिबिर यशस्वी करणेसाठी ,वृद्धमित्र, जनसेवा फाऊंडेशन , हेल्पेज या सेवाभावी संस्थेचे -अधिकारी कर्मचारी ,एच. वी. देसाई हाॅस्पीटलचे डाॅक्टर व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Read Time:3 Minute, 28 Second