Read Time:1 Minute, 8 Second
पिंपरी चिंचवड: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त माऊली पॉलिक्लिनिक आणि पॅथोलॉजी लॅबचे संचालक संदिप लहाने यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वाल्हेकरवाडी करण्यात आले होते.
हे शिबीर दिनांक १६ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान घेण्यात आले होते. उच्च रक्तदाब (बी.पी.), बालक सर्वरोग निदान, मुतखडा, मधुमेह (शुगर), पोटाचे विकार, त्वचा आणि केस विकार, थायरॉईड, सांधेदुखी, अॅसिडिटी आजारांवर उपचार व मार्गदर्शन केले. तसेच CBC Test, पॅथोलॉजी लॅब टेस्ट, HB Test, Blood group Test, HBA1C Test, ESR Test, Blood, Sugar Test इत्यादी टेस्टवर 50% सूट देण्यात आली होती.
डॉ. रवि मुधोळ आणि डॉ. रोहन महाजन यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी केली.