पुणे, 9 एप्रिल : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव असलेल्या कारने पाठीमागून कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
नेमका कसा झाला अपघात?
स्कोडा कंपनीची कार चालक अतिशय सुस्साट चालवत होता. मुंबईच्या दिशेने जात असतानाच गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच एक ट्रक बंद अवस्थेत होता. मार्गाच्या बाजुला असलेल्या या ट्रकच्या खाली ही कार घुसली. पन्नास मीटर पासूनच ब्रेक लावल्याने चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसत आहेत. यावरून गाडी अतिशय सुसाट वेगात असल्याचा अंदाज यंत्रणांनी वर्तविला आहे.
ब्रेक दाबल्यानंतरही गाडी थेट ट्रकच्या खाली शिरली. यावरुन गाडीचा वेग किती जोरात होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. ही धडक इतकी जोराची होती की कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर तर झालाच आणि गाडीतील चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अपघाताची शृंखला थांबता थांबेना. मुंबईतील एकवीरेंचे भाविक लोणावळ्यात एकविरा देवीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या गाडीला तीन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने चार ते पाच वेळा पलटी मारली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा आरपीटीएस साठे मिसळच्या अवघड वळणावर हा अपघात घडला. सकाळी 8 च्या सुमारास झालेल्या या अपघातातील कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. कार भरधाव वेगात होती. वळणावर आल्यामुळे कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरली आण 3 ते 4 पलट्या मारून थांबली. मात्र दैव बलवत्तर होतं म्हणून कारमधील प्रवासी सुखरूप वाचले. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
… [Trackback]
[…] Find More Information here to that Topic: marathi.reportertodaynews.com/four-died-on-the-spot-in-a-tragic-accident-on-mumbai-pune-expressway/ […]
… [Trackback]
[…] Info on that Topic: marathi.reportertodaynews.com/four-died-on-the-spot-in-a-tragic-accident-on-mumbai-pune-expressway/ […]
… [Trackback]
[…] Find More here to that Topic: marathi.reportertodaynews.com/four-died-on-the-spot-in-a-tragic-accident-on-mumbai-pune-expressway/ […]