August 13, 2022
भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी; 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
Views: 92
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 27 Second

तिरुवनंतरपुरम, 01 ऑगस्ट : भारतात शिरकाव केलेल्या मंकीपॉक्सने आता पहिला बळी घेतला आहे. 22 वर्षांच्या तरुणाचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या केरळमध्ये देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला त्याच केरळात मंकीपॉक्समुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सची धास्ती निर्माण झाली आहे.

मंकीपॉक्समुळे मृत्यू होणारा हा तरुण 22 जुलैला यूएईहून भारतात आला होता. त्यानंतर त्याच्या मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली होती. 27 जुलैला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 जुलैला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याचा अर्थ या तरुणाला मंकीपॉक्स होतो आणि मंकीपॉक्स व्हायरसमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

केरळ, दिल्लीत मंकीपॉक्स

 

देशातील मंकीपॉक्सचे तीन रुग्ण केरळ तर एक रुग्ण दिल्लीत आहे. केरळच्या कोल्लममध्ये 14 जुलैला मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. हाच भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण.  त्याला तीव्र ताप होता आणि त्याच्या शरीरावर चकत्या होत्या. 12 जुलैला तो यूएईहून भारतात आला. यूएईमध्ये एका मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात तो आला होता. त्यानंतर 18 जुलैला कन्नूररमध्ये दुसरा रुग्ण आढळला. 31 वर्षाचा हा रुग्णही दुबईतून आला होता.  13 जुलैला तो दुबईहून परतला आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यात लक्षणं दिसू लागली. त्याच्यातील लक्षणंही पहिल्या रुग्णासारखीच होती. तर 22 जुलैला आढळलेला मलाप्पुरमधील तिसरा रुग्णही यूएईमधून परतला आहे. 6 जुलैला तो यूएईहून भारतात आला, 13 जुलैला त्याच्यात लक्षणं दिसू लागली.

त्यानंतर देशातील चौथा रुग्ण सापडला तो दिल्लीत. या रुग्णाचे वय 34 वर्षे असून त्याने कधीच परदेश प्रवास केलेला नाही. पण हिमाचल प्रदेशमधील मनालीत एका लग्नाच्या आदल्या दिवशी बॅचलर पार्टीला त्याने हजेरी लावली होती. परदेश प्रवास नसलेला देशातील हा पहिला रुग्ण आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं
शरीरावर पुरळ
खूप ताप
डोकेदुखी
स्नायू दुखणे
अशक्तपणा
लिम्फ नोड्स सुजणे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
Is there any news?