ग्रामीण भागातील महिला कारागिरांनी बनवलेल्या बांबूच्या वस्तूंचे पुण्यात प्रदर्शन; सवलतीच्या व माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध
Views: 477
1 0

Share with:


Read Time:4 Minute, 24 Second
रामदास तांबे
पुणे: प्रत्येकाला घराचे सौंदर्य हवेहवेसे वाटते. त्यात हस्तकलेच्या वस्तू घरात शोभून दिसतात. या हस्तकलेतून तयार केलेल्या सुंदर-सुंदर हस्तवस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असल्यास पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सदाशिव पेठ, टिळक रोड याठिकाणी भेट द्यायला हवी. हस्तकला विकास आयुक्त कार्यालय वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली प्रायोजित व जनजागृती विकास संस्था, आगरनरळ, जि. रत्नागिरी आयोजित केले आहे. बांबूपासून टिकाऊ अशा विविध आणि सुंदर वस्तू डोळ्यांचे पारणे फेडणारे भव्य हस्तकला प्रदर्शन 28 एप्रिलपर्यंत असणार आहे.
साबण डब्बा, कॉर्नर दिवा,  बांबू पेनकार्ड, टेबल लॅम्प, कंटेनर, बिस्किट स्टॅन्ड, स्वस्तिक, अगरबत्ती स्टैंड, फुलांची परडी, फ्रुट बास्केट, टिशू पेपर स्टॅन्ड, बांगडी स्टॅन्ड, नारळाच्या कवटीपासून बनवलेला पावडर डब्बा, मोबाईल स्टॅन्ड, टेबल मॅट, हँगिंग लॅम्प या आकर्षक वस्तूंनी आपल्या घराची शोभा वाढवून नक्कीच दिसेल. याशिवाय तोरण, केळीचे पान, महाराष्ट्रीयन ज्वेलरी, हॅन्डमेड बॅग, झारखंड साडी, गिफ्ट आर्टिकल्स, साडी कव्हर, पर्स, कॉटन सिल्क बॅग, सीड बेड ज्वेलरी, वेदर प्रोडक्ट, लिनन बंगाली साडी, ड्रेस, मेकअप बॉक्स, फोटो फ्रेम हेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या वस्तूमध्ये उत्कृष्ट कलाकुसरांचा आदर्श नमूना पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील महिला कारागीरांकडून तयार केलेल्या शोभिवंत व गृहोपयोगी वस्तू हस्तकलेतून साकारलेल्या या विविध वस्तू सवलतीच्या व माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
यावेळी जनजागृती विकास संस्थेच्या अध्यक्षा शोभा लवंडे यांनी सांगितले की, आम्हाला रोजगार निर्मिती करून द्यायची आहे त्यानिमित्ताने आम्ही हे प्रदर्शन आयोजित केले आहे. टेबल दिवा, साबण डब्बा अश्या वस्तुंना बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्यातून महिला कारागिरांना आर्थिक परिस्थिती बदलली पाहिजे, तसेच महिला सबलीकरण व्हावे यासाठी हस्तकला विकास आयुक्त कार्यालय वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली ने संधी उपलब्ध करून दिली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी 8411832109 / 7972146110 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच अर्णवी महाकाळ यांनी सांगितले की, जनजागृती विकास संस्थेच्या वतीने बांबूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे डिझायनर मार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन माझ्यासारख्या अनेक होतकरू महिलांना रोजगार प्राप्त करून दिला.
प्रभावती महाकाळ, स्वामिनी मींढे, मीनल महाकाळ, वेदिका महाकाळ, गोरंग राजबन्सी, संतोष शेटे, स्मिता कुळकर्णी, सारिका बागुल, मृणाल मडाक्तेश्वर, गडगे एम्. एम्., सुजाता मराठे, घिरेंद्रनाथ मंडल,
 बी. एस. चव्हाण, गौरंग, वैदेही लवंदे, धनिष्ठा, अर्णवी महाकाळ, सुतापा भुनिया, पूजा, मधु धारिवाल या महिलांनी या प्रदर्शनात सहभागी घेतला आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
1
Is there any news?