‘लव्ह जिहाद’ विरोधात देशव्यापी कायदा लागू करा – महंत यति मां चेतनानंद सरस्वती
Views: 171
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 14 Second

पुणे: गेल्या 1400 वर्षांपासून हिंदू युवती आणि महिलांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदू युवतींना फूस लावून, फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांचा छळ केला जात आहे. आता याची सीमा ओलांडली आहे. ‘लव्ह जिहाद’ अंतर्गत निकिता तोमर, तनिष्का शर्मा या युवतींच्या केलेल्या हत्या या हल्लीच्याच घटना जिहादींचे मनोबल वाढवत आहेत. हिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला पाहिजे, अशी मागणी गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वति यांनी केली. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘लव्ह जिहाद : हिंदु सून हवी, मात्र हिंदु जावई नको !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होत्या.

महंत यति मां चेतनानंद सरस्वति पुढे म्हणाल्या की, ‘विवाह’ आणि ‘निकाह’ यांमध्ये काय अंतर आहे, हे हिंदु पालकांनी आपल्या मुलांना शिकवलेलेच नाही. जे हिंदु युवक मुसलमान युवतींशी विवाह करतात, त्यांंच्या हत्या केल्या जातात, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदूंनी आता बचावात्मक भूमिकेत राहणे सोडून आपल्या युवतींच्या रक्षणासाठी प्रयत्नरत झाले पाहिजे.
सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री म्हणाल्या की, विवाहानंतर हिंदू स्त्रियांना ‘अर्धांगिनी’चा दर्जा दिला आहे. ‘लव्ह जिहाद’ हे एक षड्यंत्र असून यांपासून हिंदू युवतींना वाचवण्याची आवश्यकता आहे. याविषयी समाजात जागृती करायला हवी. आपल्या मुलींना धर्मशिक्षण देऊन योग्य संस्कार द्यायला हवेत. साधनेमुळे आपले गमावलेले संतुलन मिळवता येते. जर आपल्या हिंदु धर्माविषयी हिंदू युवतींना शिकवले नाही, तर धर्माभिमान नसलेल्या हिंदू युवतींना फूस लावून कोणीही पळवून नेईल. ‘इस्लाम’ काय आहे ? त्यामध्ये महिलांना काय दर्जा आहे ? हे सुद्धा आपल्या युवतींना सांगण्याची गरज आहे.

‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – श्री. समीर चाकू

हिंदू युवतींना जाळ्यात ओढण्याचे ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु युवक असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदू युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो. या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदू युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते, त्यांना वेश्या व्यवसायात पाठविले जाते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे, असे ‘द लीगल हिंदु’चे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक श्री. समीर चाकू या वेळी म्हणाले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?