पिंपरी चिंचवड मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील बेवारस, नादुरुस्त वाहने न हटविल्यास अतिक्रमण पथक कार्यवाही करणार – महापालिका आयुक्त राजेश पाटील
Views: 1202
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 26 Second

पिंपरी चिंचवड, ७ जानेवारी :-  महापालिका हद्दीतील नादुरुस्त बेवारस वाहनांना ७ दिवसाची नोटीस देवुन वाहन मालकांना मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील अथवा इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे आदी हटविण्याची संधी दिली जाणार आहे. अशी वाहने दिलेल्या मुदतीत वाहनमालकांनी न हटविल्यास महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण पथकाने ती वाहने उचलण्याची कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी आज दिले.
केंद्र शासनाकडुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली असुन त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे / स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याकरीता शहर स्वच्छ व सुंदर राखणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली व इतरत्र मनपाच्या मालकीच्या जागेवर अनेक ठिकाणी बरीच बेवारस वाहने धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये सोडुन दिलेली तसेच अनधिकृतपणे पार्क केलेली दिसतात. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता दिसुन येते.
पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण विभागामार्फत अशी जुनी व अनधिकृतपणे पार्क केलेली दुचाकी , तीन चाकी, चार चाकी इत्यादी वाहने उचलण्याबाबत पुणे महापालिका आयुक्त यांनी स्वच्छ सर्वेक्षणाची तातडी लक्षात घेवुन महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करावी असे निर्देश दिलेले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही आपल्या हद्दीतील रस्त्यावरील वाहने ८ क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागामार्फत उचलणे व त्याबाबतची सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने एका खाजगी संस्थेसमवेत करारनामा करुन बेवारस वाहने उचलण्याकामी हायड्रोलिक क्रेन व ट्रक्स इत्यादी यंत्रणा पुरविण्याबाबत कामाचे आदेश दिलेले आहेत. त्याचा क्षेत्रिय कार्यालयाला कारवाईसाठी उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ना दुरुस्त बेवारस वाहनांना ७ दिवसाची नोटीस देवुन वाहन मालकांना मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील, उड्डाणपुलाखालील व इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने त्यांचे सांगाडे इ. हटविण्याची संधी द्यावी. अशा वाहनांचे फोटो व चित्रीकरण करुन वाहनांचा सर्व तपशिलांची नोंद रजिस्टर मध्ये नोंदवणे आवश्यक राहील. सदर रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करुन ठेवण्यात यावे. सदरची वाहने वाहनमालकांनी दिलेल्या मुदतीत न हटविल्यास मनपाच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण पथकाने ती वाहने उचलण्याची कार्यवाही करुन ती मोशी येथील वाहनतळ आरक्षण क्र. १/२०५ या ठिकाणी ठेवावीत. सदरबाबत पुणे मनपा करीत असलेली संपुर्ण कार्यप्रणाली क्षेत्रिय कार्यालयांनी अवलंबिणे आवश्यक आहे, असे आदेशात नमुद केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावर, फुटपाथवर, उड्डाणपुलाखाली तसेच मनपा मालकीच्या जागेवर बंद, बेवारस, नादुरुस्त वाहने हटविण्याबाबतची कार्यवाही पुणे मनपा प्रमाणे सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागाने तातडीने सुरु करावी. याप्रमाणे कार्यवाही केल्याचा दर महिन्याचा अहवाल अतिक्रमण वअनधिकृत विभागाचे
सह शहर अभियंता यांच्याकडे सादर करण्यात यावा. जेणे करून सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा एकत्रित संकलित केलेला अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा, असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
40%
3 Star
40%
2 Star
20%
1 Star
0%

300 thoughts on “पिंपरी चिंचवड मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील बेवारस, नादुरुस्त वाहने न हटविल्यास अतिक्रमण पथक कार्यवाही करणार – महापालिका आयुक्त राजेश पाटील

  1. i have learn several just right stuff here. Definitely value bookmarking for revisiting.
    I wonder how so much effort you place to make one of these fantastic informative web site.
    온라인카지노” m really impressed with your writing skills and
    We finalize our work space and hamper within your budget
    , no matter what kind of programme you have in mind!

  2. Hello! This is kind of off topic but I need some guidance from an established blog
    hyperlink to your host I’m not sure why but this web site is loading extremely slow for me“성인망가” I’m thinking about making my own but I’m not sure where to begin.I wonder how so much effort you place to make one of these fantastic informative web site.

  3. Sex toys https://self-lover.store/ have become an integral part of modern intimate life for many people. Their variety strikes the imagination. In intimate goods stores you can find many different types and models that help diversify your sex life and give pleasure.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?