कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार करुन आपले जीवन जगावे – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील
Views: 150
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 51 Second

पिंपरी, दि. ३० जून २०२२ :-   कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार करुन आपले जीवन जगावे, आपले आरोग्य सांभाळून सामाजिक कार्य, पर्यटन अशा प्रकारचे आवडते छंद जोपासावे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जून २०२२ अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्या संध्या गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे आजी माजी पदाधिकारी नंदकुमार इंदलकर, उमेश बांदल, सुदाम वाघोले, शुभांगी चव्हाण, सुप्रिया सुरगुडे, अविनाश ढमाले, मुख्य लिपिक माया वाकडे यांच्यासह आज सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जून २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये शहर अभियंता संदेश चव्हाण, उप अभियंता प्रकाश सगर, असिस्टंट मेट्रन निर्मला गायकवाड, मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, मुख्याध्यापिका जरीना शेख, कार्यालय अधिक्षक काळूराम ववले, राजेश तांबडे, उपलेखापाल संजय काळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हरिश्चंद्र टपळे, मुख्य लिपिक आशा चोपडे, नंदकुमार मुळे, रमेश डाळींबे, सहाय्यक शिक्षक अनिल जाधव, अंकुश इंगवले, उपशिक्षिका हिरा गोपाळे, उपशिक्षक पद्माकर कोंडार, वसंत जगधने, मल्टी पर्पज वर्कर शशिकांत भोसले, ब्लड बँक टेक्निशियन दिलीप थोरात, लॅब टेक्निशियन प्रगती चव्हाण, निर्मला माने, ग्रंथालय प्रमुख रेखा गवळी, इले. मोटार पंप ऑपरेटर श्रीधर कुंभार, वीज पर्यवेक्षक दाजी खताळ, रमेश भुजबळ, वीजतंत्री रामराव कात्रे, सुरक्षा सुपरवायझर गोकुळ शेंडगे, रखवालदार विकास देशमुख, वाहनचालक जगन्नाथ पवार, माळी मोहन हेंबाडे, लिफ्टमन युवराज मांढरे, शिपाई मनोहर चिखले, मजूर हसन तांबोळी, सुभाष अडागळे, भगवान तायडे, अंकुश वाघेरे, भामाबाई बवले, सफाई कामगार दिपक म्हात्रे आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांनी यावेळी महापालिका सेवेत असताना आलेल्या अनुभवांची माहिती सांगून सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला व महापालिका सेवेबद्द्ल समाधान व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?