Read Time:1 Minute, 21 Second
पुणे: सम्राट अशोक जयंती निमित्त – प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती- पिंपरी चिंचवड आयोजित व आमंत्रित कार्यक्रमामधे,पिंपरी येथे सम्राट अशोक जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहुन,बाटीॅ व समाजकल्याणचा विविध योजना व समतादूत प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली तसेच प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती यांचामार्फत सन्मानचिन्ह देऊन प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा व समतादूत भारती अवघडे, समतादूत प्रशांत कुलकर्णी यांचा सन्मान समिती मार्फत करण्यात आला.समतादूत उषा कांबळे यांनी बुद्ध विहार औंध,समतादूत किर्ती आखाडे यांनी बुद्ध वाटिका संघ आळंदी पुणे विश्रांतवाडी येथे अनिता दहीकांबळे यांनी सातववाडी हडपसर येथे सम्राट अशोक जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम घेतले.