श्री. गजानन बँकेच्या अध्यक्षपदी अनुराधा गोरखे यांची निवड
Views: 84
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 3 Second

पिंपरी चिंचवड: बँकेचे अध्यक्ष स्व.मधुकर बाबर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक, चिंचवड या बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

 

श्री.गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या जेष्ट संचालिका मा.नगरसेवक श्रीमती.अनुराधा गोरखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. श्रीमती.गोरखे या गेली बावीस वर्षे राजकीय व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून त्या बँकेच्या संचालिका आहेत.

 

नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे अध्यासी अधिकारी श्री.नवनाथ अनपट (भोसले), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांच्या अध्यक्षते खाली दिनांक ०१/०९/२०२२ रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

 

नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती.अनुराधा गोरखे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू असे मनोगत व्यक्त केले.

 

सदर निवडणूक प्रक्रियेवेळि उपाध्यक्ष श्री.रमेश वाणी, संचालक श्री.दिलीप देशमुख, श्री.शंकर वाडकर, श्री.आनंदराव निकम, श्री.अशोक काळभोर, श्री.अतुल इनामदार, श्री.धर्मेंद्र थारेवाल, सौ.वंदना भांगडिया, सौ.वत्सला जाधव, Adv. अमित चौकडे, Adv.अभयकुमार आपटे हजर होते.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?