महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक
Views: 1428
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 7 Second

नवी दिल्ली , १२ मे  : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

*असा आहे निवडणूक कार्यक्रम*

या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार/ वि.वृ.क्र. ७५/दि.१२.०५.२०२२

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
13%
3 Star
38%
2 Star
25%
1 Star
25%

33 thoughts on “महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

  1. Learn about the side effects, dosages, and interactions. Comprehensive side effect and adverse reaction information.
    prednisone buy canada
    Actual trends of drug. Some are medicines that help people when doctors prescribe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?