पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
Views: 171
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 8 Second

पुणे: जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीने दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलवले आहे. येत्या 2 ऑगस्टला शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

शिक्षक भरतीमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय आहे. पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांचे संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात 23 शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात 19 ऑक्टोबर 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

 

2 मे 2012 ला शासन अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीला बंदी आणले. त्या भरतीला बंदी असल्यामुळे काही लोकांनी ती भरती पूर्वी झालेली आहे असे दाखवलं. यात 2013 -14, 2014 -15, 2015-16 मध्ये चुकीच्या पद्धतीने बोगस आदेश तयार करून ते कामावर असल्याचं दाखवलं आणि पुढे अनुदानितवर बदली करण्यात आली आणि त्यांचा अनुदानित पगार काढण्यात आला. पहिला प्रकार आहे , असं जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी सांगितलं.
काही शिक्षकांनी पुढे 2017 ला आपल्याकडे पवित्र पोर्टलमुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काही चुकीच्या पद्धतीने भरती केल्याचं दाखवलं आणि सगळे शिक्षक सध्याचा पगार घेत आहेत. सोबतच त्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे शिक्षक 2010 पासून कामावरच नव्हते. त्याबाबत आम्ही त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे आणि त्यासंदर्भात अहवालदेखील सादर केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलेल्या आदेशांमुळे गुन्हा दाखल आहे.आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यासंदर्भात तपास करत आहेत. या सगळ्या प्रकरणात बोगस शिक्षकांची संख्या फार मोठी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

6 thoughts on “पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?