पिंपरी चिंचवड: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर जिजामाता हॉस्पिटल पिंपरी यांच्यासोबत आयोजन करून सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
या प्रसंगी डॉक्टर सुनिता साबळे इन्चार्ज मेडिकल ऑफिसर जिजामाता हॉस्पिटल पिंपरी, डॉक्टर गणेश तागडे व डॉक्टर स्नेहा जगदाळे फार्मासिस्ट दूधमल जाधव लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ, आशा वर्कर तसेच हाॅस्पीटल कर्मचारी, सावली बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक सचिन बोधनकर, अग्नेस फ्रान्सिस काळजी वाहक सावली बेघर निवारा केंद्र व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी बार्टीचा पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले.
बेघर निवार्यातील 55 ज्येष्ठ नागरीकांनी सदर आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.