ठेकेदार हितासाठी नागरिकांना वेठीस न धरू नका; मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांकडे निवेदन
Views: 270
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 44 Second

पिंपरी चिंचवड :- पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश डिसेंबर २०२० रोजी देण्यात आलेले असून १८ महिने पूर्ण होऊन देखील ५० टक्के काम पूर्ण नसल्याने महापालिका नागरिकांना ठेकेदार हितासाठी नागरिकांना वेठीस धरू नये असे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना दिनांक २२/१२/२०२२ रोजी १८ महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत. तसेच या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याकामी मे.ओएस असीस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामाकरिता नेमणूक करणेत आलेली आहे.
सदर कामाची मुदत १८ महिने पूर्ण होऊन देखील अद्यापपर्यंत ५० टक्के देखील काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना देखील सदर कामाचे ठेकेदार यांनी वारंवार मुदतवाढीची कारणे देत दिनांक ०९/०६/२०२२ रोजी पत्राद्वारे काम पूर्ण करणेस दि.३०/०६/२०२३ पर्यंत भाववाढ /घट सह मुदतवाढ मिळणेची विनंती केलेली आहे. यावर बी.आर.टी.एस.विभागामार्फत मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात देण्यात आलेला आहे.
या सर्व प्रकरणामध्ये नागरिकांना वेठीस धरून ठेकेदाराचे तसेच सल्लागाराचे हित जोपासण्याचा महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे. ज्या कामास व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच काम नियोजनबद्ध करणेकामी महापालिका यंत्रणा देखील आहे असे काम वेळेवर होत नाही यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही. विकासकामे हि नागरिकांच्या सोयीसाठी असतात याचा विसर बहुतेक महापालिकेस पडलेला दिसून येत आहे. या समांतर पुलामुळे पिंपरी गाव पिंपरी कॅम्प काळेवाडी पिंपळे सौदागर अशा अनेक गावांमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे तरीदेखील महापालिकेच्या वतीने होत असलेल्या दिरंगाईबाबत कोणतीही कारवाई केल्याचे आढळून येत नाही महापालिका जनहितेसाठी कटीबद्ध आहे की ठेकेदार हिताय आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावणेकामी अनेक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी यांचेमार्फत अनेक वेळा मागणी अथवा निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु महापालिका अधिकारी अश्या स्वरूपात नागरिकांना वेठीशी धरून बेजबाबदार ठेकेदारांना पाठीशी घालणार असतील याविरोधात आम्हाला मा. न्यायालयात दाद मागावी लागेल.
महापालिकेने नागरिकांना वेठीस न धरता पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश संबधित विभागास देण्यात यावेत तसेच संबधित ठेकेदार व व्यवस्थापन सल्लागार यांचा त्वरित काळ्या यादीत समावेश करण्यात यावा अशी मागणीही वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?