मोफत ई श्रम व आयुष्यमान भारत स्मार्ट कार्डचे वाटप, मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम
Views: 225
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 53 Second

पिंपरी चिंचवड :– पिंपरी परिसरातील नागरिकांना मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून  मोफत ई श्रम व पंतप्रधान जन आरोग्य योजना(आयुष्यमान भारत) योजनेचे स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी परिसरातील सामान्य नागरिक कोणत्याही शासकीय व निमशासकीय योजनेपासून वंचित राहू नये म्हणून १ जुलै २०१४ रोजी नागरी सुविधा केंद्राची स्थापना पिंपरी येथे करण्यात आली होती. या नागरी सुविधा केंद्रामार्फत महापालिकेच्या विधवा सहाय्यता निधी,मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती,सायकल वाटप,अपंग व दिव्यांग नागरिकांना पेन्शन,महिलांना शिलाई मशीन अशा महापालिकेच्या अनेक योजनांचा लाभ घेता आला, तसेच पिंपरी  परिसरातील गरीब कुटुंबाना केंद्र सरकारच्या ई श्रम व आयुष्यमान भारत या विमा योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरी सुविधा केंद्र येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीरामध्ये ६१९ नागरिकांना मोफत स्मार्ट कार्ड देण्यात आले. ई श्रम कार्डमुळे असंघटीत कामगारांना अपघाती मृत्यू आल्यास २ लाख रुपये तसेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरु केलेल्या   आयुष्मान योजनेतून ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत पुणे जिल्ह्यातील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना जेष्ठ प्रबोधनकार श्रीमती शारदाताई मुंडे म्हणाल्या कि, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम घेत असतात परंतु शासकीय योजनांचा शहरातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत लाभ देणारे संदीप वाघेरे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. नगरसदस्य पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील वाघेरे यांनी आपले कार्य अखंड अविरत सुरु ठेवले आहे. जनसंपर्क कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम त्यांचे मार्फत त्वरित मार्गी लावले जाते हे त्यांच्या स्वभावगुणाचे वैशिष्ट्य आहे.
या कार्यक्रमास मा. नगरसेवक संदीप वाघेरे, जेष्ठ प्रबोधनकार शारदा मुंडे,शांताराम सातव, रामभाऊ कुदळे, संदीप कापसे,मदन गोयल ,दत्तोबा नाणेकर,संजय गायके, कुमार सोहंदा, कैलास भुजबळ,अशोक कुदळे,विजय जाचक,जयेश चौधरी,राजेंद्र वाघेरे ,रविंद्र कदम,कुणाल सातव,अक्षय नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?