पिंपरी चिंचवड : स्पर्श फौंडेशन तर्फे व मेवानी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने पिंपरी विधानसभा येथील गोरगरीब गरजवंताना ३० किलो रेशनची कीट (तांदूळ, गव्हाचे पीठ, तुरडाळ, मुगडाळ, पोहे, रवा, हरभरा डाळ, चवळी, हळदी पावडर, मिरची पावडर, साखर, मीठ, चहा पावडर ) अशी कीट बनवून १५,००० गरजू लोकांना, दिव्यांग ( अपंग, मुखबधीर, दृष्टिहीन), विधवा, वयोवृद्ध यांना अशी १५,००० नागरिकांना रेशनची कीट देण्यात आली आहे व येणाऱ्या काळात आणखी ५ ते १० हजार लोकांना रेशनची कीट वाटप करणार आहे.
या कार्यास योगदान देणारे व परिश्रम घेणारे दिपक हिरालाल मेवानी व माजी नगरसेवक कोमलताई मेवानी, अर्जुनदास मेवानी, अनिल मेवानी, चंदर मेवानी, दिनेश मेवानी, हर्ष मेवानी, साहिल मेवानी, राहुल मेवानी, तनिष मेवानी, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, अमरजित यादव, प्रविण वडमारे, दिपक कांबळे, मुकेश माने, विनोद जगताप, रणजित कांबळे. सुनिल साठे, सोनू शिरसाठ, विजय, पोळके, नम्रता भाट, माधुरी, शंकर नाथानी, योगेश गायकवाड, नरेश खानचंदानी, चंदू खेमचंदानी, शिवा पिल्ले, प्रकाश राखियानी, नरेंद्र शाही, अमर कापसे, विलास पाडाळे व सर्व मित्र परिवार यांनी योगदान दिले आहे.
यावेळी श्री दिपक मेवानी म्हणाले कि, समाजातील गोर गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी सदरच उपक्रम आम्ही राबविला आहे. अन्नदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असल्यामुळे गरजू लोकांची भूक भागवण्याचा हा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही अश्या प्रकारची समाजसेवा हि चालूच राहील.