पाथर्डी: बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाच्या नामफलकाची विटंबना करण्यात आली. या घटनेचा जाहीर निषेध यशवंत बिग्रेड ने पाथर्डी मध्ये केला आहे. ज्या मातेने इंग्रजांनी हिंदू धर्माची मंदिर पाडली होती. मंदिर नामशेष करण्याचा प्रयत्न केला होता त्या मंदिरांची मातेने जीर्णोद्धार केला. स्थापना केली संस्कृती टिकवून ठेवली. परंतु आज समाजात असे काही समाजकंठक आहेत ते राजमातेचे नाव मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत ती व्यक्ती समजाला आणि देशाला कलंकित आहेत. परंतु हे आम्ही कदापी खपवून घेणार नाहीत ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व आरोपीला शिक्षा देण्यात यावी यापुढे माता अहिल्या देवीच्या नावाला धक्का जर लावला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि आमच्या मातेचा अपमान कदापी सहन करून घेणार नाहीत याची पोलिस यंत्रणा व प्रशासनाचे नोंद घ्यावी व दोषीवर कडक कार्यवाही करावी असे निवेदन जय मल्हार युवा प्रतिष्ठान पाथर्डी व यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दखल घेत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी युवा नेते नानाभाऊ पडळकर, योगेश लोखंडे, आबासाहेब निचळ (सोशल मीडिया प्रमुख) युवा नेते रामभाऊ हंडाळ, संतोष दिंडे, शहादेव नरोटे, प्रदीप हंडाळ, अतुल कटरनवरे, बाप्पू हंडाळ, राकेश खोर्दे, अमोल हंडाळ गोरक्ष हंडाळ, बाप्पु निचळ, पप्पु खटके यांच्या वतीने देण्यात आले.