पशुधनातील लंपी चर्म रोगाची महाराष्ट्रातील सद्यस्थिती, जाणून घ्या या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे
Views: 854
0 0

Share with:


Read Time:8 Minute, 43 Second

लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी चर्म रोग हा पशुचानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे खालील प्रमाणे आहेत. प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येते..

सुरवातीस ताप येतो. दुध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू १०-५० मि.मि. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर येतात.

तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळयातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच डोळयांची दृष्टी बाधित होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

सन २०२०-२१ मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यामध्ये, तसेच २०२१-२२ मध्ये १० जिल्ह्यांत लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता.

सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

राज्यात सर्वप्रथम दि. ४.८.२०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालूक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी चर्मडिसिज सदृष्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.

तद्नंतर राज्यामध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद व कोल्हापूर या १३ जिल्ह्यांमध्ये दि. ०४.०८. २०२२ अखेर एकूण १२८ गावांमध्ये लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील ६०१ गावातील एकूण २,१६,८९१ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावांतील एकूण २०६६ बाधित पशुधनापैकी एकूण ७१५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील ११ अहमदनगर जिल्ह्यातील ३, पुणे जिल्ह्यात २ व बुलडाणा जिल्ह्यात १ असे एकूण १७ बाधित जनावरांमध्ये मरतुक झाली आहे.

“प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009” (The Prevention and Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, 2009) नुसार संसर्ग केंद्रापासून ५ किमी क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करता येते. शासनाची अधिसूचना दि. १७.५२०२२ अन्वये जिल्हाधिकारी यांना उक्त अधिनियमाखालील अधिकार वापरण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या नुसार संबंधित जिल्हाधिकार्यांनी नियंत्रित क्षेत्र घोषित केले असून सदरील क्षेत्रात रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे..

सदर रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे.

a) बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.b) निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.

c) जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे लंपी चर्म रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

d) बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

e) साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.

f) बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १% फॉर्मलीन किंवा २ ३ % सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ % यांचा वापर करता येईल.

(g) या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

h) सदर रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी.

i) रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

j) बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे.

k) रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी.

1) लम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने, पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास माहीती तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्र. १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

m) “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009” (The Prevention and Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, 2009) मधील कलम ४ (१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?