सांगलीच्या उप वनासंरक्षक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
Views: 493
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 22 Second

सांगली: सांगलीतील एका महिला वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याने एका उप वनसंरक्षक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजय माने असे या उप वनाधिकाऱ्याचे नाव आहे. माने यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वृत्त पसरताच सांगलीत खळबळ उडाली आहे.

वन विभागातील एका महिला वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याने ही फिर्याद दाखल केली आहे. कुपवाड या ठिकाणी असणाऱ्या वन विभागाच्या कार्यालय मध्ये सदर महिला वनक्षेत्रपाल अधिकारी कामाच्या निमित्ताने आली होती.यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या केबिनमध्ये गेली असता,त्या ठिकाणी विजय माने यांनी सदर महिला अधिकाऱ्यास आपल्या डायरीमध्ये असणारे काही मजकूर वाचण्यासाठी जवळ बोलावत,सदर महिलेच्या सोबत जबरदस्ती करत विनयभंग केला आहे.

२८ एप्रिल २०२२ रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याला मानसिक धक्का बसला होता. दरम्यान, या प्रकरणी सदर महिला अधिकाऱ्याने कुटुंबासमवेत शुक्रवारी, ०६ मे रोजी कुपवाड पोलीस ठाण्यात उप वनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात जबरदस्ती करण्याबरोबर विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार उपवन संरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंग गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी वन विभागाच्या कार्यालयातून वनसंरक्षक अधिकारी विजय माने यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाचा तपास मिरज शहर पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?