या वेळी लेखक आणि अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की, वर्ष 1961 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते, तर पाकिस्तानची सीमा आपल्या आसपास दिसली असती. हे वाक्य खूपच महत्त्वपूर्ण आहे. तसेच मुघल इतिहासकार तारुकी अली नरूला, तसेच आदिलशाह यांची कागदपत्रे तपासल्यावर त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात अनेक मशिदी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच अफजलखानाला पाठवले गेले. यावरून छत्रपती शिवराय हे ‘सेक्युलर’ कधीही नव्हते आणि नाहीत.
या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे म्हणाले की, केवळ छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ करण्याचा प्रकार नाही, तर ते देव मानत नव्हते, धर्म मानत नव्हते, असाही ठसवण्याचा भयंकर प्रयत्न ब्रिगेडी लोकांकडून चालू आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे निस्सीम भक्त होते आणि समर्थ रामदासस्वामी हे त्यांचे गुरु होते, हे छत्रपती शिवरायांचे वंशज मानतात. केवळ हिंदूंना त्यांच्या ध्येयापासून विन्मुख करण्यासाठी प्रत्यन चालू आहे. या वेळी सव्यासाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य लखन जाधव म्हणाले की, आज कार्यकर्त्यांना केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा द्यायला लावल्या जात आहेत; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, प्रेरणा, राज्यकारभार शिकवला जात नाही. महाराजांचे गड-किल्ले भग्न होत असतांना त्यांचे रक्षण न करता त्यावर मदिशी, दर्गे उभारले जात आहेत. छत्रपती शिवरायांनी जे 36 वर्षे लढून मिळवले ते धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे.