पुणे: मावळ तालुक्यातील कोथुर्णेगाव येथे घडलेल्या अत्याचार व हत्या प्रकरणातील चिमुकली स्वरा जनार्दन चांदेकर हिच्या पीडित कुटूंबियांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते
प्रकाश महाजन मनसे प्रवक्ते महाराष्ट्र राज्य, गणेश_सातपुते-मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सचिन_चिखले-मनसे नगरसेवक, शहर अध्यक्ष पिं.चिं यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन परिवाराची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांशी बोलताना सातपुते यांनी पक्षाच्यावतीने स्वराच्या पुढील कायदेशीर व न्यायालीन लढ्यासाठी गरज भासल्यास विशेष कायदे तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व मदत पुरवली जाईल, असा विश्वास यावेळी त्यांनी परिवाराला दिला तसेच कुटुंबियांनी या प्रसंगी आपल्या तीव्र शोक-भावना व्यक्त करत असताना अत्याचारी व हत्येतील नाराधाम आरोपींना स्वराच्या जन्मदिनाच्या आतच फाशीची शिक्षा मिळावी हीच खऱ्या अर्थाने स्वराला सर्व राजकीय नेत्यांची खरी श्रद्धांजलीठरेल अशी भावनिक मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,पुणे जिल्हा अध्यक्ष रस्त्ते अस्थापना व साधन सुविधा सचिन भांडवलकर,सुशांत साळवी,उपसरपंच भीमराव दळवी,कोर कमेटी सदस्य अनिल वरघडे,सुरेश जाधव,संजय शिंदे,पांडुरंग असवले,भारत चिकणे,अमित भोसले, संदीप फोटफोडे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Read Time:2 Minute, 11 Second