पुणे: योगाभ्यासाचे विविध पैलू आणि त्याच्या उपयुक्ततेला व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ‘योग महोत्सव 2022’ हे 100 दिवसांचे अभियान, 100 संस्थांकडून 100 ठिकाणी सुरू करण्यात आले. त्याचबरोबर जागतिक शांतता, आरोग्य, कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस -2022 च्या 100 दिवसांच्या काउंटडाऊन अभियानाला प्रसिद्धी देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 च्या 100 दिवसांचे काउंटडाउन अभियान साजरे करण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN), भारत सरकारचे आयुष मंत्रालय, आगाखान पॅलेस, पुणे येथे ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ या विषयावर एक सत्र आयोजित करत आहे. त्यानंतर ‘रोग प्रतिकारशक्तीसाठी योग’ या विषयावर दोन तासांची कार्यशाळा आणि व्याख्यानदेखील आगा खान पॅलेसच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे. 30 मार्च 2022 रोजी सकाळी 7 ते 11 दरम्यान हा उपक्रम होणार आहे.
वेळापत्रक:
सकाळी 7:00 – 7:30 – उद्घाटन
7:30 am – 8:30 am – कॉमन योग प्रोटोकॉलचा सराव
सकाळी 9:00 ते 11:00 am – रोग प्रतिकारशक्तीसाठी योग या विषयावर कार्यशाळा
सत्र 1 – रोग प्रतिकारशक्तीसाठी योग – योगगुरू, विश्वास मंडलिक, संस्थापक, योगविद्यागुरुकुल, नाशिक.
सत्र 2 – योग आणि आहाराची तत्त्वे – डॉ. अभिषेक देवीकर, संचालक, निसर्गोपचार आश्रम, उरुळीकांचन
सत्र 3 – उत्तम आरोग्यासाठी योग – डॉ. राज कुलकर्णी, संचालक, डॉ. आर. के लाइफस्टाइल डिसऑर्डर्स अँड पेन मॅनेजमेंट क्लिनिक, पुणे
आगा खान पॅलेसच्या विश्वस्तांसह, राजेंद्र यादव, अधीक्षकीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई क्षेत्र, निखिल देशमुख, उपसंचालक, रिजनल आउटरीच ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार .आणि इतर अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
जागतिक योग मंचावर आपल्या पुणे शहराचे नाव ठळकपणे कोरण्यासाठी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे संचालक, पुण्यातील सर्व आरोग्य आणि योगप्रेमींना वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगा खान पॅलेस येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे हार्दिक आमंत्रण देत आहेत.