संभाजी ब्रिगेड च्या वतीने “राजर्षी शाहू महाराज जयंती “लोकराज्य दिन”म्हणुन साजरी
Views: 260
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 32 Second

पिंपरी चिंचवड: संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने छत्रपती शाहू महाराज स्मारक दसरा चौक चिंचवड येथे “लोकराज्य दिन” प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर चे नेते मनोजकूमार गायकवाड शहराध्यक्ष प्रविण कदम यांच्या हस्ते पूर्णांकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.
जयंतीच्या निमित्ताने उपस्थितांना मिठाई चे वाटप करून आनंद सोहळा साजरा करण्यात आला, व शाहू राजांचा जिवन संघर्ष काय आहे ? यावर शहराध्यक्ष प्रविण कदम यानी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण व आजच्या शिक्षण सम्राटांचे शिक्षणाचे बाजारीकरण या विषयावर अभिमन्यू पवार यानी उपस्थित बांधवांना विस्त्रुत मार्गदर्शन केले.छत्रपती शाहू महाराजानी सामाजिक बंधुता जोपासली व ती वाढवली आहे. शाहू राजांचे अपुरे राहिलेले काम पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यानी काम केले पाहिजे असे मत मनोजकुमार गायकवाड यानी व्यक्त केले. सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रामध्ये भरीव कार्य करून बहुजनांचे मजबूत केले बाहू म्हणूनच आम्ही म्हणतो लोकराजे शाहू. अशा कर्तूत्वान राजाचा जन्मदिन संभाजी ब्रिगेडने यावर्षीपासून “लोकराज्यदिन” म्हणून साजरी केली. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर निमंत्रित होते त्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा स्मिता म्हसकर, मराठवाडा जन संघचे अरुण पवार,वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे साल्हारभाई शेख,राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे सुधीर पुंडे,मातोश्री सामाजिक संस्थाचे गणेश पाडले , जनकल्याण प्रतिष्ठानचे बाळासाहेब काकडे,ग्रामीण युवा संघटनचे सतीश हतोले, पुरोगामी चळवळी चे अँड नितनवरे ईत्यादि संघटनांचे निमंत्रित अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते “लोकराज्यदिन ” साजरा करण्यासाठी सहभाग होते. या जयंती उत्सवात संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष तेजस गवई,श्रीकांत गोरे,अँड साहेबराव साळुंके,राजेश सातपुते,जगदीश दूधभाते,मोहसीन शाह, सतीश मर्दान घावटे,एजाज शेख, राहुल पवार इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

6 thoughts on “संभाजी ब्रिगेड च्या वतीने “राजर्षी शाहू महाराज जयंती “लोकराज्य दिन”म्हणुन साजरी

  1. Monitor Closely 1 artemether lumefantrine will decrease the level or effect of triamcinolone acetonide injectable suspension by affecting hepatic intestinal enzyme CYP3A4 metabolism doxycycline and prednisone Zometa is delivered intravenously into a vein once yearly in a 5 milligram dose

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?