शिक्षण सेवकांचा पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आनंदोत्सव, नियमित नोकरी मिळाल्याने जल्लोष
Views: 242
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 14 Second

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ६८ शिक्षण सेवकांना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियमिततेचे आदेश करण्यात आले. यावेळी संबंधित शिक्षण सेवकांनी आंनंदोत्सव साजरा केला. महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण सेवकांनी अक्षरश: जल्लोष केला.

पिंपरी- चिंचवड महापालिका अंतर्गत काम करणारे ६८ शिक्षण सेवक नियमित सेवेत घेण्यात आले आहेत . त्यामुळे ३ वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना पदवीधर संघटना व आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे “दिवाळी गिफ्ट” मिळाले आहे. पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी शिक्षण सेवकांना नियमिततेचे आदेश विनाविलंब मिळावेत यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला होता.
तसेच आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , उप आयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी श्री.नाईकडे यांचीही भेट घेऊन शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीचे आदेश तातडीने मिळावेत यासाठी चर्चाही केली केली होती. आमदार लांडगे यांनी स्वतः पाठपुरावा करून संबंधित शिक्षण सेवकांना दिवाळी पूर्व आदेश मिळावेत या पदवीधर संघटनेची मागणी प्रशासनाकडे लावून धरली होती, अशी माहिती मनोज मराठे यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी महापालिका भवनामध्ये आमदार लांडगे यांच्या हस्ते आणि अति.आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अति. आयुक्त श्री.जितेंद्र वाघ , अति.आयुक्त उल्हास जगताप विभाग प्रमुख संदीप खोत उपस्थितीत शिक्षण सेवकांना नियमिततेतेचे आदेश देण्यात आलेत.

पदवीधर शिक्षक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शिक्षण सेवकांना दिवाळी पूर्व आज नियमिततेचे आदेश प्रशासनामार्फत मा.आमदार श्री.महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहेत. प्रशासनातर्फे सहकार्य केल्याने निश्चितच ६८ शिक्षण सेवकांची दिवाळी गोड झाली आहे.
– मनोज मराठे,
राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य पदवीधर’ प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?