पिंपरी चिंचवड: निगडीप्राधिकरण मधील पेठ क्र. २७ गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज (शेगांव) यांचा 144 वा प्रगट दिन महोत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्ताने दिवसभर पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काकड आरती: सादरकर्ते श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ
देहूगांव आणि हनुमान भजनी मंडळ, आकुर्डी
श्रींची महापूजा, महाभिषेक व आरती
हस्ते सौ. व श्री. अॅड. विजयराव दांदडे पाटील
सौ. व श्री. प्रभाकर आडकर परिवार
पौरोहित्य: डॉ. श्री. माधवराव भरकुटे गुरुजी,
श्री. जोगळेकर काका
“गण हीम” हस्ते सौ. व श्री. रविंद्र मिरजी
पौरोहित्य वेदशास्त्र संप्पन श्री. संतोष बक्षी, आणि ब्रह्मवृंद
श्री गजानन विजय ग्रंथ प्रथम अध्याय वाचन तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, उपाध्यक्ष भाऊराव खडसे, उपाध्यक्ष रवि मिरजी, खजिनदार महादेव फसले, सहसचिव सचिन राडे, सहसचिव सुरेश गुळवे यांनी आयोजन केले होते.