भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला  म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
Views: 262
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 42 Second

हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे  आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  भारतीय  चैत्र  शुद्ध  प्रतिपदेच्या  दिवशी  सृष्टीची  निर्मिती झाली, म्हणून  हा केवळ हिंदू धर्मियांचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना  ‘1 जानेवारी हाच नववर्षारंभ दिवस आहे’, असा अपसमज निर्माण केल्याने स्वतंत्र भारतातही बहुतांश लोक 1 जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे  करत  पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि लाभकारक आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरातील विविध राज्यांत सोशल मिडिया, फलक प्रसिद्धी, व्याख्याने आदी माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला का साजरे करावे ? या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला का साजरे करावे ? या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित केला होता. यामध्ये बिहार येथील वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशनचे एशिया चॅप्टर चेअरमैन आचार्य अशोक कुमार मिश्र म्हणाले, ‘ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या शुभ दिवशी हिंदु नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी नववर्ष साजरे करणे वैज्ञानिक, प्राकृतिक आणि सामाजिक दृष्टीने योग्य आहे तसेच ज्योतिष दृष्टीने सुद्धा उत्तम आहे. मात्र गेग्रोरिअन कैलेंडरनुसार नववर्ष साजरे करणे याला कुठला ठोस आधार नाही.
दिल्ली येथील वैज्ञानिक, विचारक आणि लेखक डॉ. ओमप्रकाश पांडे म्हणाले, हिंदु नववर्षाच्या दिवशी शुभसंकल्प केला जातो. कालचक्राचा अभ्यास केल्यास चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष का साजरे केले जाते, हे लक्षात येईल. सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यावेळी म्हणाल्या, हिंदु नववर्षाला भारतात राज्यपरत्वे वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. हिंदु नववर्षाच्या दरम्यान आपण निसर्गातील बदल अनुभवत असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच हिंदु नववर्ष का साजरे करावे हे जाणून हिंदु बांधवांनी समाजाचे आणि आपल्या धर्मबंधूंचे प्रबोधन करावे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?