ब्रेन वर्ल्ड एज्युटेक उद्या हेलिओस इंटरनॅशनल स्कूल ऑडिटोरियम पुणे येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदचे आयोजन
Views: 161
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 53 Second

पुणे: देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, ब्रेन वर्ल्ड एज्युटेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद चे आयोजन करण्यात आले आहे. ह्या परिषदे मध्ये सर्व शिक्षणतज्ञ, शाळा मालक, संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आमंत्रित करण्या आले आहे. पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी ह्यांचा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्व सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देऊन, सर्व शिक्षकांना ऑनलाइन भेटण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ISRO स्पेस प्रोजेक्ट सादर करण्यात येणार आहे; काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन मोदीजींनी केले होते.

शैक्षणिक परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा , मालकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. शिखर परिषदेत सद्यस्थितीतील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत. अंतराळ आणि खगोलशास्त्र शिक्षणआणि कौशल्यावर आधारित शिक्षण अश्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे .

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?