चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप
Views: 179
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 17 Second

पिंपरी चिंचवड – राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते शिधा किटचे वाटप करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणच्या रेशन धान्य दुकानांवर भाजपचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिधा वाटप कार्यक्रम पार पडले.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने दिवाळीसाठी नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. यात रेशनिंग दुकानातून १०० रुपयांत रवा, साखर, गोडतेल, चणाडाळ या चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून दिले जात आहे. हा शिधा ऑफलाइन पद्धतीने देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमधील रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप शंकर जगताप तसेच भाजपचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.
पिंपळेसौदागर येथील जिजामाता महिला मंडळाच्या स्वस्त धान्य दुकानात हा कार्यक्रम झाला. यावेळी चिंचवड पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, शहर भाजप आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे, देवीदास काटे, मानसिंग काटे, बाळू काटे, निलेश कुंजीर, दिनेश काटे (पाटील), मल्हारी काटे, संजय काटे, अशोक चोंधे आदी उपस्थित होते.
पिंपळेगुरव आणि नवी सांगवी येथील समतानगर येथे स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांच्या हस्ते रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, सखाराम रेडेकर, बाळासाहेब देवकर, सुनील कोकटे, अशोक कवडे, शिवाजी निम्हण, सुनिल देवकर, संदीप दरेकर, प्रविण जगताप, संजय धोत्रे, गणेश बनकर,  शब्बीर पठाण, गिरीश कांबळे, हेमंत पाडुळे, लीगाडे गुरूजी, राजेश पवार आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?