भाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची यादी जाहीर, उत्पल पर्रिकरांचा पत्ता कट
Views: 143
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 11 Second

पणजी: भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असं उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी मी पणजीवरच ठाम आहे,असे म्हटले आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपची ऑफर काय?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात निवडणूक लढणार असल्याचं उघड स्पष्ट झाल्यानंतर फडणवीसांना उत्पल यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी खुलासा केला. , पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आलं आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

टीएमसी गोव्यात सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवश्यावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने दाखवली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही. पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही सुटेबल पार्टी वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत, असा दावा त्यांनी केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?