नांदेड- जगभर मागील दोन वर्षा पासून आपण कोविड-१९ या महामारीचे दोन लाट आपण सर्वजण तोंड दिलो आहोत. तसा तो काळच वाईट होता. त्या वाईट काळात माणूसकी, प्रेम, स्नेहातून एकमेकांना जपणे खूप मोठी गरज होती. कोरोनाच्या काळात लांबूनच गर्दी न करता,घरा बाहेर न पडताही सुरक्षित राहूनच आपण सर्वांना एकमेकांचे आरोग्य जपत आनंदत्सव साजरा केला आहे. सध्या कोविड- १९ प्रादुर्भाव फार कमी झालेला आहे. अजून तीसरी व चौथी लाट आहे असे सांगतात. या साठीच हा लेख प्रंपज आहे. आमच्या आरोग्य सेवेतील सर्व कर्मचा-यांत लोकप्रिय असलेले आमचे मित्र सत्यजीत टिप्रेसवार यांचा आज दि. १८ मे रोजी वाढदिवस आहे. त्यानिमीत्त त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा, जीवनशैलीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.
सत्यजीत हे आपले कार्य, जवाबदारी रुग्णालयात व कार्यक्षेत्रात व्यवस्थित रित्या पार पाडतात. त्यांची पत्नी गृहनी व आमच्या ताई सौ.रंजना ताई या नेहमी त्यांना प्रोत्साहन देत असतात. दररोज सकाळी हे दांम्पत्य ५ ते ६ दरम्यान मॉर्निंग वॉक करतात व योग करत आपले आरोग्य जपतात.
त्यांना एक मुलगी कु. समीक्षा हि अभियांत्रिकी च्या पहिल्या वर्षाकरीता पुणे येथे शिक्षण घेत आहे व एक मुलगा चैतन्य हा सध्या दहावी मध्ये शिक्षण घेत आहे असा त्यांचा छोटा परिवार सुखी परिवार या म्हणी प्रमाणे आहे.
उमरी येथे आजी श्रीमती शशीकलाबाई ,वडील बालाजी, आई सौ.अनुसयाबाई, भाऊ संदीप, महेश, जावा व बच्चे कंपनी असा मोठा परिवार आहे. नुकतेच त्यांची आजी श्रीमती शशीकलाबाई टिप्रेसवार यांनी वयाची शंभरी वर्षे पार केली.
कोरोना -१९ च्या या संकट काळात त्यांनी अनेक जणांना मदत केली. योग्य मार्गदर्शन व धीर देण्याचे,मनोधैर्य वाढविण्याचे काम अत्यंत जवाबदारीने केले.
उमरी (रे.स्टे) ग्रामीण भागात सर्व साधारण घरात जन्म झालेले व्यक्तीमत्व आणि ज्यांच्या नावात मध्येच सत्यची जीत म्हणजे सत्यजीत टिप्रेसवार …. हे आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक या पदावर ग्रामीण रुग्णालय, भोकर जि.नांदेड येथे कार्यरत आहेत. आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) तालुका भोकर व मुदखेड चा प्रभारी म्हणून काम पाहतात. अत्यंत साधी राहणीमान… कायम एक बॅग गळ्यात अडकलेली दिसणार. त्या बॅगेमध्ये डायरी,पाण्याची बाॅटल,टिफीन,काही मेडिसिन, काही महत्वाचे कागदपत्रे कायम राहणार.या बॅग मध्ये नाही असे काहीच नाही.म्हणजे थोडक्यात सत्यजीत यांच्याकडे नाही हा शब्दच नाहीच.यावरुनच सकारत्मक विचार नुसता बाळगूनच नाही तर ते विचार कृत्ती मध्ये उतरुन कधी कुणाचे काम जमत असेल तर चांगलेच करणार,शक्य असेल तर मदत करुन बाजूला होणार. हा स्वभावगुण असलेल्या या आमचा मित्राचा आज दि. १८ मे या दिवशी वाढदिवस आहे. या मित्राचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. कारण सतत कुठल्या तरी कामात, कार्यात स्वत:हाला व्यस्त ठेवणार. यामुळे एक तर आयुष्यातला जो काही वेळ आहे तो वायफळ जात नाही. माणूस यामुळे क्रियाशील राहते. या सर्व विविध कार्यातून एक एक माणूस जोडत जाते. त्यामुळे माणस जोडत जातात. मैत्री हीच संपती बनवून वाढत जाते. ही संपती केवळ या मित्राकडे प्रंचड दिसून येते.नुसती दिसून येत नाही तर त्या मैत्रीला कुठल्या ही वेळेला तो जपतो. सर्वांच्या सुख व दुखःत वेळ काळ आला की धावून जातो. यामुळे ही मैत्री कायम टिकून अजून वाढत जाते. मैत्री च्या जगातील राजा माणूस म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. यामुळेच सत्यजीत यांचे संघटन कौशल्य अतिशय उमटून दिसते.याचा फायदा त्यांना विविध संघटनेच्या व सामाजिक कार्यात सामावून घेतले गेले. यामध्येच राज्य हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष, राज्य आरोग्य समन्वय समितीचे यांचे राज्य प्रसिद्धी प्रमुख या संघटनेचे राज्य पातळीवरचे पद व नांदेड जिल्हाध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना हे पद सत्यजीत यांच्या कडे आहेत. या कार्यामुळेच त्यांना नांदेड जिल्हा हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी म.नांदेडच्या सचिव या मोठ्या पदाची जवाबदारी टाकून हिवताप व हत्तीरोग कार्यालयाच्या कर्मचा-यांनी यातून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. हिवताप पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासद यांच्या सहकार्याने दिर्घ मुदती कर्ज मर्यादा ७ लक्ष वरुन १० लक्ष केली आपल्या कर्मचारी बांधवांना याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले.
कोरोना-१९ विषाणू या महामारीच्या काळात आरोग्य सेवेमध्ये दिवस रात्र काम करत असतांना कोरोना विषाणू ची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत उपयुक्त व खात्रीशीर माहिती कायम देत असतात.
मा.डॉ. निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या कार्यालयाकडून दररोज कोरोना-१९ बाबत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येते ती न चुकता व्हाट्सएपच्या व सोशल मीडिया च्या माध्यमातून विविध ग्रुपवर प्रसिद्ध करतात.
सन २०१९ मध्ये वर्ग मित्र मैत्रीण दहावी- बारावी बँच १९९४-९६ यांच्याशी संपर्क साधून व्हाट्सएपचा ग्रूप तयार करून तब्बल २० वर्षानी वर्ग मित्र मैत्रीण यांचे दि.२५ डिसेंबर २०१९ रोजी स्नेहसंमेलन घेण्यात आले यामध्ये त्यांचा पुढाकार होता व स्नेह संमेलन एवढे आकर्षक झाले कि त्याची सर्वांनी स्तुत्य उपक्रम घेतल्या बद्दल प्रशंसा केली.
मागील वर्षी त्यांना ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते कोरोनो काळात उल्लेखनीय काम केल्या बद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
जेथे गेले तेथे माणसे जमवण्याचा त्यांचा हातकंठा आहे. नायगांव येथे प्रभारी हिवताप पर्यवेक्षक म्हणून काम करतांना तालुक्यात हिवताप, हत्तीरोग व डेंग्यू जनजागरण कार्याक्रमात गावामध्ये प्रभावी आरोग्य शिक्षण देवून लोकामध्ये जनजागृती केली. नायगांव येथे त्यांच्या मित्र परीवार राजकीय, पत्रकार मित्र व पद्मशाली समाज बांधव यांचा मोठा मित्र परीवार आहे. तसेच पद्मशाली समाजाचे मराठवाडा पद्मशाली युवक संघटने सचिव हे अत्यंत महत्वाचे पद, नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख व मराठवाडा पद्मशाली कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष पद ही त्यांच्याकडेच आहे. यावरुन त्यांच्याकडे चांगले संघटन कौशल्ये आहे हे सिद्ध झालेले आहे.
श्री साईबाबा शिर्डी यांचे ते निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी श्रीराम नवमी उत्सव, श्री गुरुपौर्णिमा उत्सव व नवीन वर्षाचे स्वागत शिर्डी येथे मित्र परीवार सोबत साजरी करतात. सर्व सामाजीक कार्यात ही नेहमी सहभाग नोंदवत असतो. दरवर्षी दोन-तीन वेळा स्व ईच्छेने रक्तदान ही करत असतात. कोविड-१९ च्या अगोदर आपला वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करुन गजानन मंदीर मालेगाव रोडला वृध्द आश्रमात साजरा केला. तिथल्या सर्व वृध्दांना मोठ्या उत्साहात सह परिवार अन्नदान करुन आमच्या शासकिय कर्मचा-यांत नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली.
हिवताप व हत्तीरोग कार्यालयात आस्थापना, लेखा, तांत्रिक व संगणकीय विभागात कर्मचारी यांना काहीही अडचण आली तरी मदत करतात.
वरीष्ठ अधिकारी,सहकारी व कर्मचारी मित्र यांच्या मध्ये कायम सलोख्याचे,स्नेहाचे संबंध ठेवतात. हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या अडीअडचणी विषयी वेळोवेळी वरिष्ठां सोबत चर्चा करून सांमजस्याने सर्व प्रश्न निकाली व सोडविण्याचा प्रयत्न करतात.
वरिष्ठ कार्यालय मुंबई, पुणे,नागपूर,लातूर व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभाग, हिवताप कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ते समन्वयाचे त्यांचे संबंध आहेत.
आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्य पत्रिका मध्ये नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य/ काम यांचे ते माहिती संकलन करून प्रसिद्ध करतात. तसेच आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमी पत्रात सुध्दा आरोग्य विभागात वेळोवेळी घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देतात.
राजकीय व्यक्ती, आकाशवाणी वार्ताहर, संपादक,पत्रकार,टि.व्ही. न्युज चँनेल प्रतिनिधी, वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या मोठा मित्र परीवार आहे.
या माणसाचा सर्वात चांगला गुण जर सांगायचा तर अलिकडे सर्व ठिकाणी प्रभावी ठरले ते सोशल मिडीया या माध्यमाचा दैनंदिन कामात व विविध क्षेत्रात कसा प्रभावी उपयोग करायचा ते आमच्या या मित्रा कडून शिकले पाहिजे. सर्वात आधी जर शासनाचे निर्णय इतर महत्वाची माहिती जर येत असेल तर सत्यजीत यांच्याकडूनच येणार ते ही अत्यंत परफ्केट व अचूक माहिती यांच्या पोष्टच्या माध्यमातून असते.यामुळे कुठल्या ही शासकिय ग्रुपवर जर सत्यजीत यांनी पोष्ट टाकली तर ती अत्यंत विश्वनीय समजली जाते.हा सर्व ग्रुप सदस्यांचा विश्वास संपादीत केलेला आहे.शासनाची सर्व उपयूक्त माहिती कुठल्या ही वेळी बरोबर या मित्राकडे उपलब्ध राहणारच हे या काळातले समीकरण झालेले आहे.या वरुनच तांत्रीक माहितीचा किती सुंदर पध्दतीने उपयोग सत्यजीत टिप्रेसवार नेहमी करतात हे सिध्द झालेले आहे.याचा फायदा सत्यजीत यांनी पध्दतशीरपणे संपर्काचे जाळे वाढविण्यासाठी केला.कुणी काय म्हणते या कडे लक्ष न देता सतत कार्य करणे ऐवढेच उदिष्ट राहिल्यामुळेच कुठल्या ही कार्यात सत्यजीत टिप्रेसवार हे नाव येते.
सोशल मिडीया व्हाट्सएप, फेसबुक, टिव्टर, ईंस्टाग्राम यावर त्यांचा राजकीय व्यक्ती, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक व्यक्ती यांचा मोठा मित्र परीवार आहे. यावर ते नेहमी वाढदिवस, लग्न वाढदिवस, निवड व अभिनंदन असे आर्वजून सर्वात अगोदर पोस्ट करतात.
ते ही बरोबर स्मरण करुन ग्रुपवर टाकली जाते ते या मित्राकडूनच सर्वांना कळते आज कोणाचा वाढदिवस/ लग्न वाढदिवस आहे. त्यामुळे मित्राची ही गोड आठवण जपतो,साजरे करतो.यामुळेच सर्वजण सत्यजीत टिप्रेसवार यांच्यावर विश्वास टाकतात.
ज्या ठिकाणी ते जातात तेथील अधिकारी व कर्मचारी यांना कायम आपलेसे करून सोडतात.
अशा या सर्वगुण संपन्न व्यक्तिमहत्व लाभलेल्या मित्राचा आज १८ मे वाढदिवस तसेच २० मे रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या व लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..💐💐
विजय चव्हाण
नांदेड.
jsvmp hello my website is jsvmp
Conan important hello my website is Conan important
civic 4dr hello my website is civic 4dr
converse slot hello my website is converse slot
dj 2017 hello my website is dj 2017
sheet organ hello my website is sheet organ
marvel hercules hello my website is marvel hercules
human cdk hello my website is human cdk
jumat warungprediksi hello my website is jumat warungprediksi
Inappropriate, This is a good website Inappropriate
Prostate, This is a good website Prostate
Scrotum, This is a good website Scrotum
Cialis, This is a good website Cialis
Vulva, This is a good website Vulva
viagra, This is a good website viagra
Erotic, This is a good website Erotic
Genitals, This is a good website Genitals
Sex pill, This is a good website Sex pill