पिंपरी चिंचवड :- मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व महाराष्ट्रातील पत्रकारितेचे भिष्माचार्य एस. एम. देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, ज्येष्ठ सल्लागार नाना कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, तुळशीदास शिंदे, सरचिटणीस मारुती बानेवार, समन्वयक विनायक गायकवाड, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवे हे उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे -१८ येथे शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी सकाळी ९ वा संपन्न होत आहे. हा सत्कार समारंभ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते तसेच प्रसाद काथे संपादक जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
यावेळी विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख जानवी पाटील, सचिव संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, कार्याध्यक्ष मराठी पत्रकार परिषद शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया जनार्दन दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भांडवलकर, उपाध्यक्ष सचिन कांकरीया, उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्या के डी. गव्हाणे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्या अनील भालेराव, जिल्हा प्रतिनिधि एम जी शेलार, जिल्हा प्रतिनिधी दादाराव आढाव हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद्घाटन समारंभास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले हे भूषविणार आहेत. या कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ अॅडवोकेट असीम सरोदे, गुरुदास भोंडवे व देवदत्त कशाळीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.