पुणे: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पत्रकार बांधवाचा सन्मान कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृह येथे संपन्न झाला.
ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब ढसाळ यांनी मौलिक मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांनी पत्रकार म्हणून आलेले विविध अनुभव कथन केले.
प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांनी बार्टी व सामाजिक समता कार्यक्रमाची व या कार्यक्रमाची माहिती दिली.
याचबरोबर पत्रकार बांधवांचा सन्मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री जगताप सर व प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा यांचा हस्ते करण्यात आला.
अतिरिक्त उपायुक्त जगताप सर यांनी बार्टीचा सामाजिक समता कार्यक्रम या उपक्रमाचे कौतुक केले व पत्रकार बांधवाचा सन्मान हा उपक्रम घेतल्याबद्दल बार्टीचे आभारदेखील व्यक्त केले.तसेच वेळोवेळी बार्टीचा उपक्रमांना सहकार्य करणेचे आश्वासन दिले. सर्व पत्रकार बांधवांनी देखील सदर उपक्रमाबाबत बार्टीचे कौतुक व आभार व्यक्त केले .
या कार्यक्रमास लोकसत्ता, पुढारी , दै. केसरी व इतर स्थानिक वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमासाठी समतादूत प्रशांत कुलकर्णी, समतादूत भारती अवघडे, समतादूत जया सोनोने यांनी परीश्रम घेतले.याचबरोबर, समतादूत अनिता दहीकांबळे यांनी रामटेकडी व समतादूत किर्ती आखाडे यांनी येरवडा येथे समता सप्ताह अंतर्गत पत्रकार बांधव यांचा सन्मान हा पत्रकार बांधव याचा समवेत कार्यक्रम घेतला.

Read Time:2 Minute, 16 Second