Read Time:1 Minute, 12 Second
पुणे: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत १० ते१४ तास सलग वाचन / अभ्यास उपक्रमाचे बार्टी समतादूत मार्फत पुण्यात ठिकठिकाणी आयोजन आले होते.
शितल बंडगर,प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा यांनी स्वरूपवर्धिनी मंगळवार पेठ या ठिकाणी १२ तास वाचन/अभ्यास प्रकल्प राबवला,समतादूत किर्ती आखाडे यांनी तक्षशीला बुद्धविहार या ठिकाणी १४ तास वाचन/ अभ्यास प्रकल्प राबविला,समतादूत उषा कांबळे यांनी त्रैलोक्य बुद्व विहार या ठिकाणी १२ तास वाचन/ अभ्यास उपक्रम राबविला. समतादूत सचिन कांबळे यांनी अंनतराव थोपटे महाविद्यालय येथे १० तास सलग वाचन उपक्रम राबविला. समतादूत अनिता दहीकांबळे यांनी एस एम जोशी विद्यालय येथे १२ तास वाचन उपक्रम राबविला.