Read Time:1 Minute, 12 Second
पुणे: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत भांडगाव दौंड येथे, भांडगावचे सरपंच संतोष दोरगे, ग्रामविकास जगताप, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा सर्वांचा सहभागाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विकासकामे व वस्ती सुधार योजना लाभार्थींचे मनोगत घेऊन सामाजिक समता समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच समतादूत किर्ती आखाडे यांनी राजीवनगर , समतादूत अनिता दहीकांबळे यांनी सातववाडी व उषा कांबळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ विहार परिसर इ. ठिकठिकाणी समतादूत यांचा द्वारे
स्वच्छता अभियान राबवत, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.