पुणे: मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे पुणे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड
सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यातून सामाजिक योगदान दिल्याबद्दल राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.सदर कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलींद जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध संगीतकार रविंद्र गांगुर्डे पंडित सुहासजी व्यास किशोर सरपोतदार हे उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.या पुरस्कार सोहळ्यात यावर्षी *मराठवाडा पत्रकारिता रत्न* हा पुरस्कार आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच विद्यावास्पती विद्यानंद शैलेश कुलकर्णी धाराशिव यांना मराठवाडा धर्म रत्न, प्राध्यापक भाऊसाहेब जाधव लातूर यांना मराठवाडा शिक्षण रत्न, प्रदिप रोडे, बीड यांना मराठवाडा शिक्षण रत्न, डॉक्टर दामोदर पतंगे यांना मराठवाडा वैद्यकीय रत्न, डॉक्टर अमोघ जोशी संभाजीनगर यांना मराठवाडा वैद्यकीय स्वर रत्न,पंडित कल्याणजी गायकवाड,धाराशिव यांना मराठवाडा संगीत रत्न, सुरज लोळगे, पैठण यांना मराठवाडा युवा समाज रत्न,श्रमिक गोजमगुंडे लातूर, यांना मराठवाडा दुर्गसंवर्धन रत्न, अँड सतीश देशमुख बीड यांना मराठवाडा विधिरत्न, आदिनाथ गोरे नायगाव धाराशिव यांना मराठवाडा उद्योग रत्न,बबन जोगदंड नांदेड,यांना मराठवाडा साहित्यरत्न,विश्वास शाईवाले, गुंजोटी धाराशिव यांना मराठवाडा स्वर रत्न,
तसेच लिज्जत पापड महिला गृह उद्योग समूहाचे
सुरेशजी कोते हाॅटेल व्यवसायिक प्रवीण शेट्टी यांना मराठवाडा मित्र 2022 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण
मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.