पुणे -आर्यन्स समुहाच्या वतीने पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड या राष्ट्रीय स्तरावरील कोषात प्रत्येकी पाचशे कोटी,राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी याप्रमाणे तब्बल अठराशे कोटी निधी सामाजिक दायित्व म्हणून समर्पित करणार असल्याची घोषणा आज समूहाचे सीईओ मनोहर जगताप यांनी केली.
राज्यात,देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्यानेच आपल्या विविध व्यावसायिक श्रृंखलेतून
उद्योगक्षेत्रात पायाभरणी करीत असलेल्या आर्यन्स उद्योग समूहाच्या वतीने सुरू झालेल्या व येत्या २६ जून रोजी उद्घाटन केले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.जगताप यांनी राष्ट्रीय व राज्य सहाय्यता कोषात भरीव योगदान देण्याचे जाहीर करतांनाच आरोग्य क्षेत्रात कोरोना काळात व पश्चातही अत्यंत पायाभूत समजल्या जाणारे तब्बल ३७ व्हॅटीलेटर लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगत प्रत्यक्षात औध येथील रुग्णालयाला प्रातिनिधिक स्वरूपात स्व.सुनील मुरलीधर जगताप यांच्या स्मरणार्थ श्रीमती वत्सलाबाई मुरलीधर जगताप यांच्याहस्ते डॉ.गिरीष कुऱ्हाडे यांना व्हॅटीलेटर सुपूर्द केले.
ओमा फौंडेशनच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून उर्वरित ३५ व्हॅटीलेटर लवकरच देण्यात येतील.
श्री.जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना स्पष्ट केले की,आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यावर्षी आपला यशोत्सव साजरा करत आहे. समूहाने आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला असून येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या १२० एकरवर फक्त नैसर्गिक स्त्रोतातून साकारल्या जाणार असलेल्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन प्रस्तावित आहे.आर्यन्स समूह रिफायनरी, एक्सर ई-बाईक,लिथियम आयन बॅटरी, सोडियम आयन बॅटरी, हायड्रोजन फ्युएल,बायोफ्युएल, विन एअर, आद्या एअर कॅब सर्व्हिसेस या उपक्रमासह दळणवळण क्षेत्रात पदार्पण करत असून ऑरगॅनिक शेती,होम अप्लयांस,स्व नावाने ह्युमन रोबोट,सोलर एनर्जी आदी ४७ क्षेत्रात सेवारत राहणार असल्याचे लाईव्ह सादरीकरण उपस्थित पत्रकारांना दाखवले.यातील काही उपक्रमांचे पंतप्रधान श्री.मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.गडकरी,अर्थराज्य मंत्री भागवत कराड,मुख्यमंत्री उद्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या उद्घाटन होणार आहे,असे नमूद केले.
*एक्सर ई- बाईकचे सुद्धा वाटप -*
राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आशा वर्कर्स,महाराष्ट्र पोलिस दलाला व पुणे पोलिसांना प्रत्येकी शंभर याप्रमाणे ३०० एक्सर ई-बाईक समुहाच्या वतीने मोफत वाटप केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद जगताप, ओमा फौंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, संचालक संजय शेंडगे, कामेश मोदी, किरण लोहार आदी संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे, निखिल जाधव,अविनाश उबाळे, प्रवीण कदम आदींनी परिश्रम घेतले.