मानवी स्वभावानुसार त्याला ठराविक एका काळानंतर बदल हवासा असतो. मग तो गरजेचा असेल किंवा सवयीचा.
खरं तर गरज आणि सवय एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकमेकांना जोडून असणाऱ्या. गरजेतून सवय निर्माण होते आणि एकदा का सवय झाली कि मग त्यावर विसंबून राहणं होते.
मग नाती वाईट का? नात्याला असलेले बंधन खोटे का ? मानवी जीवनातील सगळेच बदल स्विकार करणे प्रसंगानुरूप योग्य की अयोग्य ?
बदल हा माणसाच्या मनात वसलेला स्थिर भाव आहे आणि तोच शाश्वत आहे.
पण हे बदल स्विकारण बरेचदा वेदनांचा प्रवास असतो. कारण हा बदल होणार किंवा होईल ह्याचा विचारच आपण कधी केलेला नसतो.
बदल हवा हे आणि हेच सत्य असते. नात्यात तर कार्यकारण भाव महत्वाचा असतो. एकदा तो सरला कि गरज आणि सवय दोन्ही बदलते.
तर नाही, असे नाही. बंध किंवा नाती खोटी नसतात. तर आपण त्याच्या कार्यकारण भावाचं मर्म जाणून घेत नाही. आणि दिल्या घेतल्याचे हिशोब मांडत राहतो आणि जखमेची खपली ओलीच ठेवतो.
ह्या सगळ्या प्रवासात , आपण एक नात विसरत जातो किंवा मागे सोडत जातो ते म्हणजे स्वतःच, स्वतःशी असलेल नातं.
आयुष्यात अनेक वळणांवर अनेक हात सुटतात, अनेक नवीन हात हातात येतात. पण हे हात सुटण्यापासून परत नवीन हात हातात येईपर्यंतचा प्रवास हा अंत्यत वेदनादायक , आणि एक अनामिक रितेपण देणारा असतो.
त्या वेळी मनाची प्रचंड मोडतोड होते, समाजात वावरताना स्वतःला न्युन लेखलं जात, किंबहुना समाज स्वतः त्या व्यक्तीला कमी पणा करण्यासाठी एकही संधी गमावून देत नाही. मग व्यक्ती मार्फतच स्वतःचाच राग राग केला जातो. आणि अनेक पातळ्यांवर अनेक गोष्टी विस्कटत जातात, सुटत जातात.
ह्या वेदनेला दूर ठेवण्यासाठी “गृहीत” धरायची सवय बदलता यायला हवी.
जर गृहीत धरण्याची सवय कायमस्वरूपी अवलंबली तर ह्या वेदना मग जखमेत बदतात आणि पूर्ण आयुष्यभर राहतील असे व्रण देतात.
ह्यासाठी स्वतःजवळ स्वतःच नातं हवं, पक्कं हवं, घट्ट हवं, समजलेलं हवं म्हणजे मग अशी निसटलेली नाती, माणसं ह्यांचा स्विकार मन करतं आणि चांगल्या आठवणींसहीत मन प्रवाही राहात.
हेच नात आपल्याला एक तटस्थता आणि नात्यांची समज देत आणि निरोप अधिक मोकळे आणि समजूदार होत जातात. स्वतःला कोणताहि त्रास न देता, स्वतःच्या नजरेतून न उतरता.
चलना तो है, किसिके साथ भी, किसिके बगैर भी.
मेरी मंझिल तो तू है जिंदगी…..
सुखाचे,आनंदाचे, उर्जेचे आणि उर्मी देणारे क्षण असतील तर मनात साठवायचे पण ते क्षण कायमच मिळतच राहातील ही अपेक्षा किंवा मिळलेच पाहीजेत हा अट्टाहास नसावा.
जिंदगी बेवफा हैं फिर भी राहे जिंदगीभर साथ चलना तो है, किसी आपनेके साथ भी, अगर कोई न हाथ थामे तो किसीके बगैर भी, मेरी मंझिल तो है जिंदगी….
चलना तो है, किसिके साथ भी, किसिके बगैर भी, मेरी मंझिल तो तू है जिंदगी…..
बस इतकचं…
*🖊️माझ्या लेखनीतून :-🖊️*
*ऊर्मिला भारती, सहमहामंत्री, महाराष्ट्र राज्य, हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा.*