मनुष्य भक्ती करायला लागला की , तो देवाच्याच प्रेमात आकंठ बुडून जातो. त्याला इतर काही सुचतच नाही. मग तो प्रापंचिक कर्मे जरुरीप्रमाणे करतो पण कशी तर कर्तव्य म्हणून.
त्यातून आपल्याला अमुक एक मिळेल असा काही विषय त्याच्या डोक्यातच नसतो.
मुलाबाळांचा सांभाळ करेल , घरातील वडीलधाऱ्यांना हवं नको ते आणून देईल , पत्नीच्या इच्छा पुरवेल पण तेवढं करून झालं की , त्या सर्वांकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता तो आपणहून बाजूला होईल. हे कसं शक्य होत असेल ? असा आपल्याला प्रश्न पडतो.
त्याचं उत्तर असं आहे की , जेव्हा एखाद्या श्रेष्ठ गोष्टीचा ध्यास लागतो तेव्हा इतर गोष्टी गौण वाटू लागतात व आपोआपच दुर्लक्षीत होतात.
समजा एखादा घर बांधायचंय म्हणून पैसे साठवत असेल तर इतर लहानसहान गोष्टींच्या खरेदीकडं त्याचं आपोआपच दुर्लक्ष होतं किंवा इच्छा झाली तरी नंतर बघू आधी घर होऊदेत असे विचार मनात येतात. *त्याप्रमाणे फक्त देवाची भक्ती हे एवढं मोठ्ठं आकर्षण भक्तापुढं असतं की इतर काही त्याला सुचतच नाही. कर्तव्य म्हणून प्रापंचिक कर्मे वर सांगितल्या प्रमाणे परतफेडीच्या भावनेने करून तो त्यातून काहीही अपेक्षा न ठेवता अलगद बाजूला होतो.
हे झालं सामाजिक क्रियांबाबत कुलधर्म कुलाचार म्हणजे कर्मकांडंही तो अशीच निरपेक्षतेनं पार पाडतो भक्तीचा महिमा हा असा आहे.
ऊर्मीला भारती, राष्ट्रीय कोशाध्यक्ष, हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा