( नामदार सुधीर मुनगंटीवार (वंदे मातरम मंत्री ) यांनी नुकतीच शहरातील अशा 78 उद्योजकांसोबत गुप्त बैठक घेतली जे उद्योजक अनेक वर्षांपासून महापालिकेच्या आरक्षित शेकडो कोटींच्या भूखंडावर अतिक्रमन करून आपला व्यवसाय चालवतायत, आता तो भूखंड मोकळा करून त्यावर अत्यन्त महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प उभारायचाय मात्र उद्योजक हटायला तयार नाहीयत, पण महापालिका प्रशासन भूखंड मोकळा करण्यावर ठाम (कागदावर तरी ) आहे,म्हणून आता उद्योजकांनी सरकारचे पाय धरायला सुरवात केलीय आणि अर्थातच आपल्याकडे नसलेल्या खात्याची म्हणजे रस्ते व उद्योग खात्याच्या प्रश्नात वनमंत्री सुधीर भाऊंनी “लक्ष” घातलय )
– वरील उताऱ्याचा प्रस्तुत लेखाशी काही संबंध आहे का ते शेवटी बघू आता जरा विषय काय आहे ते बघा, विषय आहे पिंपरी शहरातील गो-तस्करीचा..
अंह… लगेच कपाळावर आठ्या आणू नका नक्की काय चाललंय ते समजून घ्या….
पिंपरी चिंचवड शहर आज जेवढं विकसित दिसतं कधीकाळी तेवढंच सुखी होतं,घराघरात दुभती जनावरं होती,आत्ताच्या प्रतिथयश लोकप्रतिनिधिंनी सुद्धा त्यांच्या तरुण वयात दुध टाकायचं कामं ( व्यवसाय ) केल्याचं सांगितलं जातं थोडक्यात कायतर त्यांच्याकडे तेवढी दुभती जनावरं आणि गोठे होते, आताही आहेत पण आता त्यांचं लक्ष्य गाई -म्हशी पेक्षा कंपण्या आणि धंदे वाढविन्याकडे जास्त आहे
दुसरीकडे
कुटुंबं वाढत असल्याने अनेकांनी गाईंना म्हशीनां सांभाळनं सोडून दिलं त्यांच्या गोठ्याच्या जागेवर घरं बांधली.
तर तिकडे गाईसाठी राखीव असलेल्या गायरानावर मनुष्य प्राण्याने कब्जा केला आणि आपली दुकानं थाटली मग गाईनां खायला काही उरलं नाही गोठ्यातून काढून दिलेल्या गाई रस्त्यावर आल्या आणि लोकांनी टाकलेलं (प्लास्टिक कॅरीबॅगसह ) मिळेल ते शीळं खरकटं अन्न त्या खाऊ लागल्या,अर्थातच मानवी अन्न त्यातही प्लास्टिकमधून येणारं अन्न त्यांना पचणार नव्हतं मग गाई तडफडून मरायला सुरवात झाली मात्र गायरानावरील अतिक्रमनाकडे जसं लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं तसं गाईंच्या अशा मरण्याचीही त्यांना दखल घ्यावी वाटली नाही
मग गल्लो गल्ली फिरणाऱ्या यां गो-धनावर तस्करांची नजर पडली आणि सुरु झाला एक अत्यन्त क्रूर खेळ..
गो-तस्करीचा हा प्रकार एवढा खतरनाक आहे कीं तो ऐकूण बघून कुणाच्याही ( माणूस असलेल्या ) तळपायाची आग मस्तकात जाईल
उदा. म्हणून सोबत एक CCTV व्हिडीओ जोडलाय तो नक्की बघा त्यात काही तरुण रस्त्यावर पडलेल्या एका गाईला आपल्या आलिशान कारमध्ये उचूलन घेऊन जातांना दिसतायत पण ही काय गो- सेवा नाहीय बरं तर हा प्रकार आहे गो- तस्करीचा.
होय…
रात्रीच्या अंधारात अशाच पद्धतीने अज्ञातांच एक टोळकं कत्तलीच्या उद्धेशानेच एका गाडीत तीन-तीन गाई कोंबून घेऊन जातात
आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी गाय तिला उचलतांना जराही ढूसन्या मारत नसेल का शिंगावर घेत नसेल कां..?
तुमचा प्रश्न बरोबर आहे मात्र गायीच्या अफाट ताकदीचा अंदाज असल्याने तिला उचलण्या आधी ती अर्धमेली होईल एवढ्या जास्त मात्रेच /ओव्हर डोसचं भूलीचं इंजेक्शन देऊन तस्कर तिला बेशुद्ध करतात
आणि मग तिला कार मध्ये असं अमानुषपणे कोंबलं जातं
अर्धातासात ही कार शहरा जवळच असलेल्या एखाद्या निर्जन स्थळावर जाते गांईना खाली फेकलं जातं आणि पुढच्या पंधरा मिनिटात गाईंना कापून त्यांचं रक्त,मास, हाडं वेगळी केली जातात ते पिशवीत भरली जातात आणि त्यावर तरकारी /भाजीपाला रचून त्यांची वाहतूक केली जाते, हा गुन्हा करणारी टोळी एवढी क्रूर आहे की ते गाईचं चामडं देखील सोडत नाहीत
शहरातील गो-प्रेमी गो रक्षक निलेश देशमुख, निलेश चासकर आणि कुणाल साठे यांनी सांगितलेली ही हकीकत आहे, निलेश देशमुख म्हणतात या प्रकारातील क्रूरतेचा कळस म्हणजे उचलून नेल्या जाणाऱ्या बहुतांश गाई ह्या गाभण / गरोदर असल्याचं बघूनच उचलल्या जातात कारण गाय कापली कीं तिच्या पोटात वाढत असलेल्या पाडसाचं कोवळं मासही त्यांना मिळतं आणि हे मास डबल किंमतीत डबल किमतीत विकून ते मालामाल होतात……..
कुणाल म्हटला
पूर्वीही असे प्रकार घडायचे पण आता ते सर्रास घडतायत धक्कादायक बाब म्हणजे तस्करी करणारी टोळी हत्यारबंद असते त्यांना अडवलं हटकलं तर ते पिस्तूला सारखे घातक शस्त्र दाखवत असतात आता कितीही मोठा गो-रक्षक असला तर तो विनाशस्त्र जिवावर बेतणारं धाडस करून तस्करांना रोखू शकणार नाही, त्यातही हाणामारी झालीचं तर कायदा हातात घेऊन मोठा रक्तपात घडण्याची भीतीने पोरं ह्या चोऱ्या रोखू शकत नाहीयत
मग ह्या गाईंचा वाली कोण तर देशमुख म्हणतात मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियम या महानगर पालिकांना लागू असलेल्या सरकारी पुस्तकात गो-संवर्धन करण्या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत, मात्र त्या सूचनांच पालन करायच सोडून महापालिकेचा पशु- वैद्यकीय विभाग फक्त ठेकेदार पोसतोय आणि जिवंत जनावरांचं संगोपन करण्यावर खर्च करण्या ऐवजी मेलेल्या जणांवरांची विल्हेवाट लावायला ठेकेदाराला वर्षाकाठी एक कोटी पेक्षा जास्त पैसे देतो
सध्या या विभागाचे प्रमुख दगडे आडनावाचे अधिकारी आहेत आणि नावाप्रमाणेच ते वागतात म्हणजे एकवेळ दगडाला पाझर फुटेल मात्र हा माणूस कृती करणं तर दुरुच तक्रार घेण्यासाठी ना फोनवर उपलब्ध होतो ना कार्यालयात थोडक्यात काय तर अशा संवेदनशील प्रकरणाकडेही तो ढुंकूनही बघत नसल्याचं म्हणत
दगडे ऐवजी एखादा सक्षम अधिकारी असता तर शहरातील कोंडवाडे जी उभारणी पासूनच महापालिकेच्या ताब्यात नाहीयत आणि ज्या कोंडवाड्यात राजकीय वरद हस्त असलेल्या माणसांनी अतिक्रमण केलेली आहेत ती रिकामी करून ताब्यात घेतली असती आणि मोकाट फिरणारी अशी दुभती जणांवरं त्यात राहली असती तर त्यांची अशी तस्करी झाली नसती पण दुर्दैवाने असं घडत नसल्याची खंत निलेशनी व्यक्त केली
आता अशा जणांवरांचं खास करून गो- वंशाचं रक्षण करण्याची महापालिकेनंतर दुसरी जबाबदारी आहे ती पोलिसांची कारण राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे
बघा काय सांगतो हा कायदा-
महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू होऊन आता आठ वर्ष पूर्ण होतायत कायद्यातील तरतुदीनुसार गाय, बैल, वळू यांची कत्तल करून त्यांचं मास ताब्यात ठेवता येणार नाही, किंवा त्या उद्धेशाने त्यांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही
कायद्यातील तरतुदीचं उल्लघण झाल्यास पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे
त्याशीवाय हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीन पात्र ठरविण्यात आलाय
मात्र असं असून देखील गो-वंशाची तस्करी होतीय आणि अशा गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपिंवर केवळ animal cruelty act प्राण्यांची छळवणूक प्रतिबंध कायद्यातील जुजबी कलमनुसार गुन्हे दाखल केले जातायत आणि गुन्हेगारांची पोलिसांनी उपलब्ध करून दिलेल्या कायद्याच्या अशा पळवाटीने लेगच सुटका होतीय .
त्यामुळे एकीकडे कायद्यातील पळवाट आणि दुसरीकडे महापालिकां आणि स्वतःला स्वयंम घोषित हिंदू रक्षक,गोरक्षक वगैरे म्हणवीणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून होणारं दुर्लक्ष या शहरातील गोवंशाच्या जीवावर उठलय तेव्हा अजून किती जीव गेल्या नंतर कायद्याची अमलाबजावणी होईल ते गो-मातेच्या शरीरात वास करणाऱ्या 32 कोटी देवातांनाचं माहीत
आता राहिला प्रश्न आपल्याकडे खाते नसतांनाही सुधीर मुनगंटीवार यांनी “त्या” उद्योजकांचे अनधिकृत ( अतिक्रमणीत ) असलेल्या उद्योग वाचविण्यासाठी घेतलेल्या गुप्त बैठकीचा, तर सुधीरभाऊ…
जरा या मुक्या जणांवरांच्या रक्षणासाठिही एक मिटिंग बोलवा म्हणजे तुम्ही बोलविलेल्या “त्या ” पक्षीय आणि गुप्त मिटिंग”मध्ये प्रशासनातील जे अधिकारी उपस्थित होते तेच अधिकारी प्रोटोकॉल तोडून, सुट्टीच्या दिवशी देखील आणि अर्थातच कार्यालय सोडून आणि मिटिंग पंचतारंकित हॉटेलमध्ये आयोजित केलेली असल्याने अगदी रांगत- रांगत येऊन उपस्थित राहतील आणि कदाचित या शहरापुरता तरी गाय माय हाय, पण कोणाची हा प्रश्न देखील सुटेल…
–गोविंद अ. वि. वाकडे
*PETAIndia- वालो उघडा डोळे बघा रे जरा नीट..*