पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता राजन पाटील हे येत्या 31 मे रोजी सेवा निवृत्त होत असल्याने त्याच्या जागी पदोन्नतीने आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सह शहर अभियंता मकरंद निकम यांची नियुक्ती केली आहें
महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घडना आहें त्याच दिवशी DPC आणि त्याच दिवशी पदोन्नतीची ऑर्डर त्यामुळे महापालिकेतील स्थानिक अधिकारी यांना न्याय मिळाल्याने महापालिका परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहें
शहर अभियंता म्हणून त्यांच्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याबाबत गेली एक महिन्यापासून उलट सुलट चर्चा सुरु होत्या. या पदावर वर्णी लागावी यासाठी मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, अशोक भालकर व रामदास तांबे हे अधिकारी प्रयत्नशील होते. त्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करण्यात आला होता. शेवटी स्थानिक अधिकारी मकरंद निकम यांना आयक्तांनी न्याय देऊन सगळयाची गोची निर्माण केली.
पिंपरी चिंचवड महागरपालिका शहर अभियंता या पदाचे एवढे महत्व वाढले होते की इच्छुकांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते यांच्यापर्यंत फिल्डिंग लावली होती. शहर अभियंता पदासाठी वाढता दबाव पाहून आयुक्त राजेश पाटील यांनी आज सांयकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिके “डीपीसी”ची बैठक बोलावली व या बैठकीत श्री मकरंद निकम यांची निवड झाल्याचे आदेश काढले
. शहर अभियंता पदी मकरंद निकम यांची निवड करण्यात यावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आयुक्त राजेश पाटील यांना सूचना असल्याने इतर इच्छुकांचे नावे मागे पडल्याचे सांगण्यात येते.
आयुक्तांच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत…
विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रतिनियुक्तीवर आलेले अशोक भालकर यांनी राज्यातील वरिष्ठ पातळीवर ‘फिल्डिंग’ लावली होती. भालकर हे तीन वर्षांपूर्वी शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या सह शहर अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला आहे. तसेच त्यांना सह शहर अभियंता पदावरच पदोन्नती मिळावी, यासाठी शहरातील आणि राज्यातील राजकीय व्यक्तींचा आग्रह होता. मात्र, अखेर आयुक्तांनी राजकीय दबाव झुगारुन महापालिकेतील अधिकाऱ्याला संधी दिल्याने या निर्णयाचे महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे.