पुणे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे,पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र( MCED) पुणे द्वारा आयोजित, बार्टी द्वारा स्थापित अनुसूचित जातीतील स्वयंसहाय्यता युवा गटासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत- उद्योजकता परिचय मेळावा,कृषी महाविद्यालय सभागृह , शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न झाला.
या वेळी कार्यक्रमास सुदाम थोटे( विभागीय अधिकारी, MCED), मदनकुमार शेळके ( प्रकल्प अधिकारी ,MCED), सुनिल पाटील ( प्रकल्प समन्वयक MCED) , शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी, बार्टी), युवा उद्योजक राजेश कवडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले व उद्योग व्यवसाय कसा करावा या विषया सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शेळके सर यांनी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा व आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करत, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून उद्योजक होण्याचे आवाहन केले. शितल बंडगर यांनी बार्टीचे योजना – उपक्रम, स्टॅंडअप इंडिया मार्जिन मनी योजना याबाबत मार्गदर्शन करत, युवा गटाचे सदस्यांना सदर प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.
थोटे सर यांनी उद्योजक व उद्योजकता म्हणजे काय, उद्योग निवड- उभारणी, उद्योगातील संधी व कर्जप्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यापूर्वीचा बार्टी पुरस्कृत MCED – EDP बॅचचे प्रशिक्षणार्थी तथा युवा उद्योजक श्री कवडे यांनी त्यांचा प्रशिक्षणार्थीपासून ते उद्योजक होण्याचा प्रेरणादायी अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरित केले. शेळके सर यांनी उपस्थित युवा गट सदस्यांचा उद्योग व प्रशिक्षण याविषयीचा सर्व प्रश्न व शंकाचे निरसन केले.
या वेळी समतादूत यांचेमार्फत उपस्थितांचे प्रशिक्षण- प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. या अर्जाची छाननी व मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया शुक्रवार दि. 3 जून रोजी होणार असून, दि. ६ जून पासून प्रशिक्षण कार्यशाळेत सुरुवात होईल असे MCED चे प्रकल्प समन्वयक सुनिल पाटील सर यांनी सांगितले.
या मेळाव्यास स्वयं सहायता युवा गटाचे ९० सदस्य उपस्थित होते.सदरचा उद्योजक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी बार्टी पुणे जिल्हयाचे समतादूत किर्ती आखाडे,उषा कांबळे, अनिता दहीकांबळे, प्रशांत कुलकर्णी, शशिकात जाधव, भारती अवघडे, सचिन कांबळे व यांनी परीश्रम घेतले.