
पुणे : तब्बल १ कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महानगर पालीकेच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरुड पोलिस ठाण्यात लादलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपायुक्तांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. दरम्यान, मोठा अधिकारी गळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या विजय लांडगे या उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर सुमारे एक कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली आहे.
विजय भास्कर लांडे (वय ४९) हे आकाश चिन्ह विभागात वर्ग एक पदावर कार्यरत आहे. त्यांनी त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) यांच्या नावे तब्बल १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्राार प्राप्त झाली होती. दरम्यान, लाचलुचपत विभागाने याची तपासणी केली असल्याने यात तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी आज सकाळ पासून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून अधीकारी तपास करत आहे. सर्व खात्री झाल्यावर लांडगे यांनी तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले.