…आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी सांगत होते
Views: 327
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 18 Second

लतादीदी आणि पिंपरी-चिंचवड..

( *कोणत्याही नैराश्याला फक्त त्यांचा आवाज भेदू शकत होता आणि पूढेही भेदत राहील…*

…आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी सांगत होते,

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्यासाठी मागील चार दशकाहून आधीक काळ तन-मन-धन ओतणारे *भाऊसाहेब तसे राजकारणातले #फायर_ब्रँड म्हणून ओळखले जातात*
*पण जिथे कला आणि कलाकारांचा प्रश्न येतो तिथे हा माणूस अंतर्बाह्य हळवा होऊन जातो* आणि त्यांच्या याच स्वभावाने आज पासून 20 वर्षांपूर्वी आशादीदी आणि लतादिदींना एकाच व्यासपीठावर आणलं होतं..

पिंपरी चिंचवडमध्ये #आशा_भोसले यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचं ठरलं मात्र पहिला पुरस्कार द्यायचा कुणाला हे ठरेना मग भाऊसाहेब भोईर हृदनाथ मंगेशकर यांच्याकडे गेले आणि ते लगेच म्हणाले पहिला पुरस्कार “आनंदघन”लाच देऊ. पण भाऊसाहेबांना आनंदघन कोण हे कळेना मग हृद्यनाथानीच सांगितलं आनंदघन म्हणजे लतादीदी

पुरस्काराचं नावं ठरलं पुरस्कारार्थीचं नाव ठरलं पण तरीही भाऊसाहेब अस्वस्थ होते कारण काही कौटुंबिक कारणांमुळे ह्या दोन्ही दोघी बहिणी एकमेकींपासून 32 वर्ष दुरावल्या होत्या *त्यातही लतादीदी मोठ्या असल्याने त्या लहान बहिणीच्या नावाने असलेला पुरस्कार कशा स्वीकारणार हाही प्रश्न होताच* मात्र शंकेचं हे सारं आभाळ दूर सारत दोन्ही स्वरभगिनी पिंपरी चिंचवड मध्ये अवतरल्या कैक हजार श्रोत्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला आणि लता मंगेशकर पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदा येण्याचा,आशा -लता एकत्र येण्याचा आणि आशा भोसले यांच्या नावे पुरस्कार सुरू होण्याचा सगळा इतिहास एकाच दिवशी घडला
अर्थातच स्वर यात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य भोईरांना लाभलं हे त्यांचं मोठंच भाग्यच,
आज दीदी गेल्याची वार्ता त्यांना कळली आणि हा माणूस काहीसा हळवा झाला पण दीदी फक्त शरीराने गेल्या आवाज रुपी त्या चंद्र सूर्य असे पर्यंत असतील असं म्हणत त्यांनी दिदींना श्रद्धांजली वाहिली

भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केलेला आशा भोसले पुरस्कार सोहळा मागील 19 वर्षांपासून दरवर्षी या नगरीत रंगतो, संगीत क्षेत्रातील अनेक ख्यातनाम व्यक्तींचा ह्या पुरस्काराने गौरव केला जातोय
दोन दशकापासून सुरू असलेलं हे सांस्कृतिक कार्य अनेकांना मैफिल, संगीत मेजवानी किंवा फारफार तर पुरस्कार सोहळा एवढाच मर्यादित कार्यक्रम वाटतो *पण हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाहीय तर या शहराचं गुन्हेगारांच शहर ही ओळख पुसण्यासाठी उभारल्या गेलेली एक चळवळ आहे असं मी मानतो* अर्थातच मंगेशकर कुटुंबीयांनी आशा भोसले यांच्या नावे पुरस्कार देण्याची दिलेली परवानगीच या चळवळीचा त्यांच्या नकळतपणे पाया ठरला आणि हेच वास्तव आहे

गोविंद अ. वाकडे

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “…आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी सांगत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?