अलिबाग: कनकेश्वर डोंगरावरील वणव्यात औषधी वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान; आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी
Views: 141
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 51 Second

रायगड: अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या डोंगरावर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वणव्याने पेट घेतला. वणवा झपाट्याने पसरत गेल्याने आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. या आगीत कनकेश्वर डोंगरावरील औषधी वनसंपत्ती बरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्म जीव आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी तातडीन दाखल झाले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत अग्निशामन दल आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. वनरक्षक पंकज घाडी, पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे, पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे, साईश पाथरे, विवेक जोशी हे देखील मदतकार्यात सहभागी झाले होते. मात्र, यावेळी नजीकच्या गावांमधील लोकांनी मदतीसाठी पुढाकार न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

वणवा लागल्याची माहिती याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी, पर्यावरण प्रेमींना समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळेकुट्ट दिसणार म्हणून खंतही व्यक्त केली आहे. तसेच आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?