अजितदादा पवार आणि अजितभाऊ गव्हाणे यांचा संयुक्त वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नेत्र चिकित्सक तज्ञ डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले. शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत शिबिरात सहभागी होऊन आपले डोळे तपासून घेतले. शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांनी यावेळी आरोग्याचे महत्व सांगितले, ‘डोळा हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. पुढे त्यांनी नमूद केले की, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे ते डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करत राहणे व आवश्यक ती काळजी घेणे.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल येथे झालेल्या शिबिरात शाळेचे मुख्याध्यापक श्री.शामकांत कुलुमकर सर यांनी, सिद्धेश्वर स्कुल येथे मुख्याध्यापिका सौ सुजाता सावंत यांनी शिबिरास सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काशीनाथ जगताप (राष्ट्रवादी वाहतूक सेल शहराध्यक्ष) युवराज पवार (कामगार सेल अध्यक्ष, पिं. चिं शहर) मा.गोरखशेठ गवळी (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा) मा.श्री. मल्हार शेठ गवळी, श्री. डॉ.संदिप फडतरे, डाॅ.अमर भोईटे, डाॅ.सलोनी चौधरी, डॉ.साई किरण तसेच स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.सतीशचंद्र जकाते साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दादा पोकळे इत्यादी मान्यवर, गंगोत्री पार्क मित्र परिवार, पालक, तसेच विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.